राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार–2025 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नवी मुंबई, दि. १८ (विमाका) – Directorate of Information and Public Relations Maharashtra (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय) यांच्यावतीने उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रण, समाज माध्यम तसेच स्वच्छता अभियानावरील जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे व वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२६ असा आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील इच्छुकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून अर्ज प्राप्त करावेत. मुंबई शहर व उपनगरातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई–३२ येथून अर्ज घ्यावेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


पुरस्कारांची संपूर्ण यादी 

  1. अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) – रु. 1 लाख (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार (शासकीय गट – मराठी, माहिती व जनसंपर्क) – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  7. पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  9. केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (शासकीय गट – माहिती व जनसंपर्क) – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  10. समाज माध्यम पुरस्कार – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  12. पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार – राज्यस्तर – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

  1. दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
    (याव्यतिरिक्त ‘दै. गावकरी’कडून रु. 10 हजार विशेष पारितोषिक)
  2. अनंतराव भालेराव पुरस्कार (छत्रपती संभाजीनगर व लातूर विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  3. आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  4. नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  5. शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  6. ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  7. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
  8. ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) – रु. 51 हजार (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

राज्यातील पत्रकार, छायाचित्रकार व माध्यम क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

आणखी वाचा