चिपळूण, दि. २१ : पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे अक्षरशः मौनीबाबा आमदार ठरले आहेत.गेल्या १२ वर्षात त्यांनी विधानपरिषदेत एक ही प्रश्न मांडलेला नाही.पदवीधरांच्या कोणत्याही समस्यांवर त्यांनी अजिबात आवाज उठवलेला नाही.ते फक्त निवडणुकीपुरते मतदारसंघात येतात.आशा शब्दात काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी आमदार डावखरे यांच्यावर टीकास्त्र सोडत भाजपला देखील खडेबोल सुनावले.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते हुसेन दलवाई चिपळूणमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.प्रथम त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकी संदर्भात माहिती घेतली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोटे, जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव, तुळशीराम पवार, संजय जाधव, सुुर्यकांत चिपळूणकर, इब्राहिम दलवाई, अ.ल माळी, विणा जावकर, अजित कासार, इम्तियाज कडू, नंदा भालेकर, संदीप आग्रे, डाॅ दिपक विखारे, विलास संसारे, सुनिल खेडेकर, मिलन गुरव, डॉ.सरफराज गोठे, सुुर्यकांत चिपळूणकर, इब्राहिम दलवाई, शिवाजी पवार, संजय साळवी, प्रकाश विंचू, सुनील खेडेकर, संदीप बांद्रे, संदीप आग्रे, यशवंत फके, विलास संसारे, अजित शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हुसेन दलवाई म्हणाले निरंजन डावखरे यांचा पदवीधरांना काहीही फायदा झालेला नाही.त्यांना पदविधरांचे,पदवीधर शिक्षकांचे प्रश्नच समजलेले नाहीत.अनेक प्रश्न आणि अनेक समस्या असताना देखील आम.डावखरे यांनी त्याची दखल घेतलेली नाही.आणि आता पुन्हा ते निवडणुकीत उतरले आहेत.त्यांना यावेळी मात्र विधानपरिषदेत जाऊ देणार नाही.महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांचा विजय यावेळी निश्चित असून महाविकास आघाडी त्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली आहे.शिवसेना ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अन्य मित्र पक्ष देखील उत्तमपणे काम करत आहेत.
हुसेन दलवाई पुढे म्हणाले विद्यमान सरकारचे शिक्षण आणि पदवीधर यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.धनदांडगेच्या मुलांना शिक्षण आणि सुविधा तर गरीब सामान्य लोकांच्या मुलांना थातूरमातूर शिक्षण देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.गरीब मुलांनी शिक्षणच घेऊ नये असे भाजप चे धोरण ठरले आहे.जुनी पेन्शन योजनेला भाजपचा विरोध राहीला आहे.या संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित असताना सरकार लक्षच देत नाही.त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघातून अनुभवी व अभ्यासू असे रमेश किर यांना विजयी करून विधानपरिषदेत पाठवणे गरजेचे आहे.त्यामुळे २६ जून रोजी रमेश किर यांना मतदान करून पदविधरांनी विंयी विजयी करावे असे आवाहन हुसेन दलवाई यांनी केले.








