जिंदाल कंपनीने जयगड वासियांना विश्वासात घेऊन काम करा:- उदय सामंत

रत्नागिरी, दि. १९ : रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे सुरु असलेल्या जिंदाल कंपनीच्या माध्यमातून येथील मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या बाबत त्यांनी गेली अनेक वर्ष  त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिंदाल कंपनीला विनंत्या केल्या मात्र त्यांच्या अन्यायाला कोणीच न्याय मिळवून दिले नाही. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जेव्हा हा विषय गेला तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता येथील जनतेचे प्रश्न सुटावेट त्यांना न्याय मिळावा म्हणून कंपनी समवेत आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाली येथे मिटिंग लावून त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या आणि जिंदाल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्या समजावून सांगितल्या त्यावेळेस येथील मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने कबूल केले आणि तो शब्द जिंदाल कंपनीने पाळला.
  जिंदाल कंपनीच्या या प्रोजेक्टमुळे अनके शेतकरी तसेच मच्छिमार बाधीत झाले होते त्यांना आज कंपनीच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने प्रोसहन अनुदान वाटप करण्यात आले. यामध्ये मच्छिमार सोसायटी, मोठ्या यांत्रिकी बोटी, छोट्या यांत्रिकी बोटी, यांना ही नुकसान भरपाई देण्यात आली. महत्वाचे म्हणजे नांदीवडे येथील बाधित झालेल्या वाड्याना आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिंदाल कंपनीने २ कोटी रुपये मंजूर केल्याचे पत्र वाटप करण्यात आले.
 यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित मच्छिमारांना मार्गदर्शन केले ते म्हणाले माझ्या मतदार संघातील लोकांना जिंदाल कंपनीने न्याय दिला पाहिजे. माझ्या मतदार संघात बाधित झालेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा आमदार आणि जिल्ह्याचा पालकमंत्री जसा भांडतोय त्या पद्धतीने आणि तेवढ्या ताकतीने त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. आज जयगड पंचक्रोशीतील मच्छिमारांचा सोनेरी दिवस असून तुमचे अनेक वर्षाची मागणी पूर्ण करण्यासाठी मला उद्योगमंत्री व्हावे लागले तेव्हा जाऊन प्रश्न मार्गी लागले. भविष्यात कंपनीला सहकार्य करा अशी विनंती यावेळी पालकमंत्री यांनी केली.
  यावेळी उद्योजक अण्णा सामंत, तालुका प्रमुख बाबू म्हाप, प्रांताधिकारी जीवन देसाई, बाबू पाटील, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, सरपंच फरजाना डांगे, यांच्या सहित अनेक मच्छिमार, लोकप्रतिनिधी, गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा