कोकण रेल्वे मार्गावर १२ जुलैला धावणार मडगाव जं. ते चंदीगड वन वे स्पेशल गाडी

रत्नागिरी, दि. ११ : कोकण रेल्वे मार्गावर उद्या (१२ जुलै) मडगाव जं. ते चंदीगड वन वे स्पेशल ही गाडी धावणार आहे. गाडी क्र. ०२४४९ मडगाव जं. – चंदीगड वन वे स्पेशल मडगाव जंक्शन येथून उद्या सकाळी ९ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ३ वाजून २५ मिनिटांनी चंदीगडला पोहोचेल.

ही ट्रेन करमाळी, थिविम, पेरनेम, रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, कोटा जंक्शन, एच. निजामुद्दीन जंक्शन, नवी दिल्ली, पानिपत जंक्शन आणि अंबाला कँट स्टेशनवर थांबेल.

या गाडीला २२ डब्बे असून, त्यांची रचना कंपोझिट (फर्स्ट एसी + 2 टियर एसी) १ कोच, 2 टियर एसी २ कोच, 3 टायर एसी – ४ कोच, इकॉनॉमी 3 टियर एसी – २ कोच, स्लीपर – ६ कोच, जनरल – ४० डबे, पँट्री कार – १, जनरेटर कार – २ अशी असेल.

प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा