….अखेर कोकण रेल्वे सुरु

खेड, दि. १५ (प्रतिनिधी): कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळून रविवारी सायंकाळी बंद करण्यात आलेली वाहतूक तब्बल 24 तासांच्या प्रयत्नानंतर पूर्वपदावर आणण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. वाहतूक सुरू होताच मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचा रिकामा रेक घटनास्थळावरून पहिल्यांदा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

खेड तालुक्यातील दिवाणखवटी नजीक रविवारी सायंकाळी चार वाजून 48 मिनिटांनी मुसळधार पाऊस सुरू असताना दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे दिनांक 14 व 15 रोजी च्या या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या.

100 कामगारांचे त्यासाठी सहाय्य घेण्यात आले. मात्र मुसळधार पावसामुळे कामात व्यस्त येत होता आज दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेची दरड हटविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आणि सायंकाळी साडेचार वाजता कोकण रेल्वेच्या टेक्निकल विभागाकडून या मार्गावरून वाहतूक करण्याबाबत फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. त्यानंतरही अडीच तासानंतर म्हणजे सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी या मार्गावरून पहिली गाडी मांडवी ही मुंबईकडे रवाना झाली आणि खऱ्या अर्थाने तब्बल 24 तासानंतर कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.

काल सायंकाळपासून कोकण रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. कोसळलेली दराड किती वेळात मोकळी केली जाईल आणि वाहतूक कधी सुरू होईल, याबाबत या प्रवाशांना प्रतीक्षा होती. चार तासाने दरड उपसल्या नंतर वाहतूक पूर्ववत होईल असे सुरुवातीला सांगण्यात येत होते मात्र त्यानंतर रात्री मुसळधार पावसाने अधिकच जोर धरला. आज सकाळपर्यंत ही मार्ग मोकळा झाला नाही, ज्या ठिकाणी ट्रॅक्टर पडलेली दड हटवण्याचे काम सुरू होते त्याच ठिकाणी पुन्हा काही प्रमाणात माती पाण्यामुळे घसरून येत होती त्यामुळे चिखलाचे साम्राज्य ट्रॅकवर निर्माण झाले होते आणि हा चिखल बाजूला करताना कामगारांचे अक्षरशः हाल झाले.

पालकमंत्री उदय सामत मदतीला धावले मार्ग मोकळा कधी होणार होणार की नाही यासारख्या प्रश्नांची सरबत्ती कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवरील अधिकाऱ्यांवर सुरू झाले आणि प्रवासी संतप्त होऊ लागले त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही महत्त्वाची होती अखेर रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वे स्टेशनला धाव घेऊन येथे उभे असलेल्या तेजस तसेच जनशताब्दी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या सर्व अडचणी समस्या समजावून घेतला त्यानंतर या प्रवाशांच्या रात्रीच्या जेवणाची तसेच लहान मुलांसाठी दूध पुरवण्याची व्यवस्था ही करण्यात आली. रात्री नंतर सकाळी तरी गाठी सुरू होईल. मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा प्रवाशांना होती परंतु तसे झाले नाही. चिपळूण आणि खेड स्थानकांवर सुद्धा स्थानिक नागरिक आणि काहीं स्वयंसेवी संस्थांनी प्रवाशांना मदत केली.

६८ बसेस मधून प्रवाशांची रवानगी त्यानंतर कोकण रेल्वेच्या उपप्रबंधकानी या सर्व प्रवाशांची मुंबई पनवेलपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यासाठी एस टी महामंडळाकडे गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाकडून 68 गाड्यांचा पुरवठा करण्यात आला यापैकी 40 गाड्या रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पनवेल पर्यंत रवाना झाल्या तसेच चिपळूण मधून 18 बसेस तर खेड स्थानकावरून दहा बसेसच्या माध्यमातून कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर रखडलेल्या प्रवाशांना पनवेल पर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत या बसेस सोडण्यात आल्या आणि सर्व प्रवाशांची पनवेल साठी रवानगी करण्यात आली. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठे सहकार्य केले. बस वाहतूक होत असताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी सचिन वहाळकर आणि सहकाऱ्यांनी प्रवाशांना मदत केली.

सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रेल्वे मार्ग मोकळा होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. परंतु त्यानंतर कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले की साडेचार वाजता मार्ग वाहतुकीला फिट असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यामुळे यानंतर आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू होईल असे सांगितले. त्यामुळे कोकणवासीय जनतेने सुटकेचा श्वास घेतला. सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पहिली गाडी मांडवी ही खेड दिवाणखवटी येथून मुंबईकडे रवाना झाली.

को.रे.च्या १४ गाड्या झाल्या होत्या रद्द ; ७ गाड्यांचा मार्ग बदलला :

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळल्यामुळे आत्तापर्यंत १४  गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ७ गाड्या दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आल्या असून ४  गाड्या अंशतः रद्द केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. मांडवी एक्सप्रेस, गाडी क्र. ५०१०८  मडगाव जं. सावंतवाडी रोड प्रवासी गाडी, रेल्वे क्रमांक १०१०६  सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा १५  रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक १०१०४  मडगाव जं. मुंबई मांडवी एक्सप्रेस, गाडी क्र. ११००४  सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२१३४  मंगळुरु जं.- मुंबई एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२१३३  मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं., गाडी क्रमांक २०१११  मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकण कन्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक ११००३ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. तुतारी एक्सप्रेस, गाडी क्रमांक ५०१०४  रत्नागिरी दिवा प्रवासी गाडी, गाडी क्रमांक १२०५१: मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
वळवण्यात आलेल्या गाड्या :
गाडी क्र. २२१५०  पुणे जं. एर्नाकुलम जं. एक्सप्रेसला कल्याण – लोणावळा – दौंड मार्गे वळविण्यात आली असून गाडी क्र. १६३४५  लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेसही वळविण्यात आली आहे. गाडी क्र. ०९०५७ उधना मंगळुरु जंक्शन गाडी कल्याण लोणावळा दौंड जंक्शन मार्गे वळवण्यात आली आहे. गाडी क्र. १२४३२ ह. निजामुद्दीन तिरुवनंतपुरम मध्य राजधानी एक्सप्रेसचा प्रवास पनवेल – लोणावळा – दौंड जंक्शन मार्गे वळवली आहे. गाडी क्र. १२६१८  एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं.चा प्रवास भुसावळ जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे. गाडी क्र. १६३३५ गांधीधाम नागरकोईल एक्स्प्रेसचा प्रवास कल्याण लोणावळा  पुणे जंक्शन मार्गे वाडी गुंटकल धर्मावरम जं. जोलारपेट्टाई- इरोड जं. इरुगुर जं. पोदनूर जं. पलक्कड जं. शोरानूर आणि पुढील योग्य मार्गावर वळवण्यात आला. गाडी क्र. १२२८४  एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस कल्याण – लोणावळा – दौंड जंक्शन मार्गे पुन्हा वळवण्यात आली आहे.
अंशतः रद्द केलेल्या गाड्या :
गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२१२०  मडगाव जं. तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक २०११२  मडगाव जं. मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस, गाडी क्र.

खेड दिवाणखवटी बोगद्यानजीक दरड कोसळल्याने वाहतूक तब्बल 24 तास होती बंद

११००४  सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्सप्रेस रत्नागिरीत थांबविण्यात आल्या आहेत.

डी वाय एस पी माईनकर यांचे अभिनंदन: रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर जेथे प्रवाशांसाठी बसेस सोडल्या जात होत्या, त्या शिस्तबद्ध रीतीने जाव्यात, कोणतीही घाई गडबड, गोंधळ होऊ नये यासाठी धो धो पावसात उभे राहून काम केले. पोलीस खात्यातील या अधिकाऱ्याच्या कार्याचे जनतेतून कौतुक होत आहे. अंगावर पावसाचा मारा झेलत त्यांनी प्रवाशांना जी सेवा दिली ती अभिनंदनास पात्र अशीच होती.

आणखी वाचा