लायन्स क्लब संगमेश्वरच्या नवीन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न

संगमेश्वर, दि. २४ : लायन्स क्लब संगमेश्वरच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी रविवार दिनांक 21 जुलै रोजी हॉटेल द ड्राईव्ह ईंन येथे संध्याकाळी 04:00 ते 08:00 या वेळात संपन्न झाला. एम जे एफ लायन संजय पटेल यांच्या कडून नूतन अध्यक्ष श्री सुशांत उर्फ रिंकूशेठ कोळवणकर आणि त्यांच्या कार्यकारणीला शपथ देण्यात आली. मावळते अध्यक्ष एम जे एफ लायन महेश उपळेकर यांनी नूतन अध्यक्ष सुशांत कोळवणकर यांच्याकडे क्लबची अध्यक्षीय सूत्र सुपूर्त केली. लायन रिंकू शेठ कोळवणकर यांच्याबरोबरच सचिव म्हणून श्री मनोहर पटेल व खजिनदार म्हणून श्री विवेक भाई शेरे यांनी शपथ घेतली.

लायन सुशांत कोळवणकर हे संगमेश्वर मधील सुप्रसिद्ध व्यापारी असून तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्यामुळे संगमेश्वर लायन्स क्लब ला साजेशी कामगिरी यावर्षी ते करतील असा सर्वांना विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रिंकू शेठ कोळवणकर यांनी सांगितलं की माजी अध्यक्ष ला.श्री महेश उपळेकर यांनी खूप छान काम केलं आहे त्यांच्या कारकीर्दीत काही अपूर्ण राहिलेली काम यावर्षी प्रामुख्याने पूर्ण करण्याचा आपण ऑटोकट प्रयत्न करू यामध्ये लायन्स महोत्सव, लायन्स व्हींजन सेंटर, लायन्स क्लब संगमेश्वर ची स्वतःची वास्तू इत्यादींचा समावेश आहे.
संगमेश्वर क्लबचे संस्थापक सदस्य आणि गायडिंग PDG mjf ला.उदय लोध यांनी दरवर्षीप्रमाणेच या नूतन कार्यकारिणीला अनुभवी मार्गदर्शन केलं.कायम लायन्स क्लब संगमेश्वर सोबत आपण आहोत असा विश्वास व्यक्त केला.

नूतन अध्यक्ष लायन सुशांत कोळवणकर यांची जनमानसातील प्रतिमा पाहता लायन्स क्लबच्या या शपथ ग्रहण व पदवीदान सोहळ्याला विविध स्तरातील नागरिकानी उपस्थित राहून सुशांत कोळवणकर यांना शुभेच्छा दिल्या.सूत्र संचालन ला. श्री. गुलाम पारेख यांनी केले.

संगमेश्वर मधील सामाजिक कार्यकर्ते मानसोपचार तज्ञ श्री. अमित सामंत यांचा देखील या कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आला.

नूतन अध्यक्ष श्री रिंकू शेठ कोळवणकर यांनी निसर्गाचे भान ठेवून प्रत्येक सदस्याला एक झाडाचं रोप देऊन त्याचे संगोपन करण्याचे वचन घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आणखी वाचा