रत्नागिरी, दि. २४ : कोकणातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी पुन्हा एकदा हादरली असून आठवड्याभरात दुसरी घटना घडली आहे यापूर्वी पुष्पर केमिकल कंपनीत लागलेला अधिक चार जण जखमी झाले होते तर आज मंगळवारी रात्री उशिरा काही वेळापूर्वी एक्सल इंडस्ट्रीज मध्ये झालेल्या वायूगळतीत बाधित झालेल्या चार जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोटे केमिकल एमआयडीसी चर्चेत आली आहे. या वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर घटनेनंतर लोटे परिसरातील काही नागरिकांनी कंपनीच्या गेट समोर ठिय्या मांडला आहे. दगडू चाळके ७२, वेदिका चाळके 37, जयश्री चाळके 60, विधी चाळके 3 याच चार जणांना वायू गळतीचा त्रास झाल्याने घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात लोटे एमआयडीसीत एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये वायू गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत चार जणांना या वायूमुळे मोठा त्रास होत असल्याने त्यांना घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. लोटे परिसरात असलेल्या चाळके वाडीतील चार नागरिकांना घरडा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल आहे. यामध्ये एका तीन वर्षीय बालिकेचाही समावेश आहे. दगडू चाळके ७२, वेदिका चाळके 37, जयश्री चाळके 60, विधी चाळके 3 याच चार जणांना वायू गळतीचा त्रास झाल्याने घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.
मात्र या वायू गळतीचा त्रास आणखी काही जणांना झाल्याची माहिती आहे. वायूगळतीमुळे चाळकेवाडी व लोटे परिसरात अनेक वाड्यातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती परिसरातील स्थानिकांनी दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा नऊ वाजण्याच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. गॅस लिकेज झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती. ग्रामस्थांना परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. ग्रामस्थांना कंपन्यांमध्ये माहिती दिली जात नाही व सोडले जात नाही अशी तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. या घटनेनंतर अनेक नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती आहे चार दिवसांपूर्वीच पुष्कर कंपनीमध्ये लागलेल्या आगीत चार कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा लोटे एमआयडीसी चर्चेत आले आहे.








