अखेर लाल परी वडवली, आतलें, शेवरे मार्गे धावली ग्रामस्थांत उत्साह

मंडणगड, दि. १५ (प्रतिनिधी): मंडणगड तालुक्यातील देव्हारे वडवली, आतले, शेवरे मार्गे चींचघर हा एस टी रस्ता ४५ वर्षा पूर्वी  होऊन देखील या रस्त्यावरून एस् टी गाडी धावत न्हवती  वडवली, आतले, शेवरे ग्रामस्थ मंडळीनी  या  गावांतून मुंबई  एस टी गाडी चालू करावी यासाठी क्रीत्येक वर्षे  सतत मागणी करत होते या गावांतून गाडी नसल्याने  मुंबईला जाणाऱ्या व मुंबईवरून येणाऱ्या चाकरमानी तसेच ग्रामस्थांची खूपच गैरसोय होत होती.
सर्वांना खासगी बसने  प्रवास करत लागत असे  ग्रामीण भागातील तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी तसेच आजारी वृध्द लोकांना  तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत असे  अखेर वडवली,आतले, शेवरे या तीन गावातील ग्रामस्थानी एकजूट होऊन मंडणगड एस् टी  आगार प्रमुख यांच्या कडे बोरिवली बोरथळ, बोरथळ देव्हारे, वडवली, आतले शेवरे मार्गे चालू करावी यासाठी  निवेदन दिले  या गावांतील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेवून मंडणगड एस् टी आगाराने तसेच दापोली मंडणगड तालुक्याचे कार्य सम्राट आमदार योगेश दादा कदम यांच्या शिफारशीने तसेच मंडणगड तालुका प्रमुख प्रताप जी घोसाळकर,यांच्या पाठ पुराव्याने व सिद्धेश देशपांडे यांच्या प्रयत्नाने अखेर १२जुलै रोजी  बोरथळ बोरिवली  बोरिवली बोरथळ शेवरे आतले, वडवली देव्हारे मार्गे चालू करण्यात आली तिन्ही गावांतील ग्रामस्थानी दणक्यात स्वागत केले तिन्ही गावांतील ग्रामस्थात उत्साह चे वातावरण पसरले आपल्या गावांत एस टी गाडी चालू झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू  वाहू लागले कारण बरेच वर्षे या तीन गावांचे स्वप्न होते लाल परी आपल्या गावातून कधी धावेल अखेर तिन्ही गावांतील स्वप्न पूर्ण झाले लाल परी चे आगमन होताच तिन्ही गावांतील ग्रामस्थमंडळीनी गाडीचे जल्लोषाने स्वागत केले  चींचघर ग्रामपंचायत सरपंच प्रतीक्षा लोंढे यांनी प्रथम एस टी गाडीची पूजा केली तिन्ही ग्रामस्थ मंडळीच्या  वतीने वाहन चालक,शिवाजी गडदे,  वाहक नाना आंबेकर यांचा शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला  तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ फोडून  एस टी गाडी सोडण्यात आली या प्रसंगी, चींचघर ग्रामपंचायत सरपंच प्रतीक्षा लोंढे, तसेच ग्रामस्थ बळीराम महाडिक, कृष्णा घागरूम , सुनील गावडे संदीप महाडिक सतीश लोंढे, रमेश शिर्के ,दिनेश फराटे, रोहिणी शिर्के तसेच वडवली आतले गावातील  अमृत मोडकले ,राजू मोडकले,प्रमोद म्हाबदी रमेश मोडकले, किशोर बंगाल  सखाराम म्हाबदी,संतोष मोडकले प्रकाश दोडकडे, तुषार करावडे ,संगीत बने, स्वप्निल आग्रे ,तसेच वडवली, आतले  शेवरे गावातील असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

आणखी वाचा