“तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र” : एमटीडीसीचा अभिनव छायाचित्रण उपक्रम सुरू

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी): महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) “तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र” या नावाने एक अद्वितीय छायाचित्रण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पर्यटकांच्या नजरेतून टिपलेले, भावनिक आणि कलात्मक दृष्टिकोनातून साकारलेले महाराष्ट्राचे सौंदर्य जगासमोर मांडणे.
या उपक्रमाअंतर्गत पर्यटकांनी एमटीडीसीच्या कोणत्याही पर्यटनस्थळी घेतलेले छायाचित्रे पाठवायची असून, निवडक फोटो MTDC च्या वेबसाईट, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स तसेच विविध कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध केले जातील.
उपक्रमाबाबत माहिती देताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) म्हणाले की, “महाराष्ट्र म्हणजे एक अनुभव आहे, निसर्ग, संस्कृती आणि कलेचा संगम आहे. या उपक्रमामार्फत आम्ही अशा नजरेतून टिपलेल्या क्षणांना शोधतो आहोत, जे महाराष्ट्राची अमोल कहाणी जगापर्यंत पोहोचवतील.”
हा उपक्रम पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून, महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल हे संपूर्ण समन्वय साधत आहेत. तसेच प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
📸 स्पर्धेतील वैशिष्ट्ये –
Image of the Day / Week / Month / Year अंतर्गत विजेते निवड
प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार, तसेच टॉप १० फोटोसाठी ‘Honourable Mention’
निवडक फोटो विशेष प्रदर्शनात समाविष्ट
विजेत्यांना एमटीडीसी तर्फे सन्मानचिन्ह व प्रसिद्धी
📷 मूल्यांकन निकष –
✔ दृश्य सौंदर्य व कलात्मक मांडणी
✔ सांस्कृतिक, नैसर्गिक व भौगोलिक सुसंगती
✔ फोटोमधून साकारलेली कथा व सर्जनशीलता
🖼 फोटो पाठवण्यासाठी लिंक –
👉 https://forms.gle/rpUWF8zTQudr7jzh8
अधिक माहितीसाठी भेट द्या – www.mtdc.co
तर मग, तुमचा कॅमेरा सज्ज ठेवा… क्लिक करा… आणि महाराष्ट्राचे दृश्यकाव्य साकार करा!

आणखी वाचा