भांडुप मध्ये मोबाईल टॉवर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही. काही घरांचे नुकसान

मुंबई, दि. २२ : गेल्या दोन दिवसापासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी दिवसभर सुसाट वाऱ्यासह मुसळधार पावसात अनेक ठिकाणी मातीचे भूस्खलन होणे , पाणी साचने अशा घटना घडल्या. रविवारी दुपारी घाटकोपर भटवाडी येथे मातीचे भूस्खलन झाले तर संध्याकाळी भांडुप मध्ये मोबाईल टॉवर कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही मात्र घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

भांडुप मधील रमाबाई नगर नंबर 1 मध्ये हा मोबाईल टॉवर होता. रविवारी संध्याकाळच्या दरम्यान जोरात सुसाटलेल्या वाऱ्यासह पावसाने काल मोबाईल टॉवर कोसळून काही घरांवर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरांचे पत्रे , भिंती ना मोठे तडे जाऊन तीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी भांडुप पोलिसांनी धाव घेतली असून यात कोणीही जखमी नसून घरांचेच नुकसान झाले आहे. तर या प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नसून चौकशी सुरू असल्याचे भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी सांगितले.

आणखी वाचा