पालकमंत्री उदय सामंत यांनी टेभ्ये- हतीस – सोमेश्वर गावाचा डीपीचा प्रश्न लावला मार्गी

रत्नागिरी, दि. २५ : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यांनी आज टेभ्ये- हतीस – सोमेश्वर या गावाला भेट दिली. येथील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. येथे अनेक वर्ष डीपीची अडचण असल्यामुळे त्याचा फटका ग्रामस्थांना बसत होता. ही बाब पालकमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला डीपीचा विषय काही मिनटात मार्गी लावून टेभ्ये- हतीस – सोमेश्वर येथील लोकांचा प्रश्न सोडवला.

यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता, तसेच महावितरणचे अधिकारी उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, तालुका प्रमुख बाबू म्हाप, सरपंच अशोक नागवेकर,उपसरपंच संतोष साळवी,श्रीरीश चव्हाण,विनायक नागवेकर, विजय बने, प्रकाश साळवी महेंद्र नागवेकर उपस्थित होते.

आणखी वाचा