पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील पत्रकारांसाठी कार्यशाळा

रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सूचनेनुसार विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील पत्रकारांसाठी शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांच्या उपस्थितीत  कार्यशाळा आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली.
सायंकाळी 6 ते 8 वा. यावेळेत होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते होणार आहे. कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे हे पत्रकारांसाठी असणाऱ्या विविध योजना, शासनाने घेतलेले विविध विकास विषयक निर्णय या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच  निवृत्त उपसंचालक सतीश लळीत हे फेक न्यूज, एआय तंत्रज्ञान, समाज माध्यम हातळणी आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

आणखी वाचा