राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मंगळवारी दि. 20 ऑगस्ट रोजी इंदूमिलला भेट देऊन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाची पाहणी करणार

मुंबई दि. १८ (क्षितिज कदम): महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे इंदुमीलला येत्या मंगळवार दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भेट देणार आहेत. इंदुमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाचा राज्यपाल महमहिम डॉ.सी पी राधाकृष्णन आढावा घेणार आहेत. आज राजभवन येथे केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेऊन इंदुमिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाची पाहणी करण्याची विनंती केली.त्यास मान्यता देऊन राज्यपाल महमहीम डॉ सी पी राधाकृष्णन यांनी येत्या मंगळवार दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता इंदुमील स्थळी भेट देण्याचे निश्चित केले असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.

महाराष्ट्राचे नवनियुक्त –
राज्यपाल महमहिम डॉ.सी पी राधाकॄष्णन यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी आज सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद स्विकारल्या नंतर आज प्रथमच राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन यांची ना.रामदास आठवले यांनी पहिल्यांदाच भेट घेऊन अभिनंदन केले.यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर
दिलखुलास चर्चा झाली.यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम आणि रिपाइं चे ज्येष्ठ नेते सुरेश बार्शिंग; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; विद्यार्थी नेते चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा