रत्नागिरी विठ्ठल मंदिरात श्री अक्कलकोट संस्थान अन्नछत्र पालखीचे आगमन; गुरुवारी भव्य मिरवणूक

रत्नागिरी, दि. १९ फेब्रुवारी : शहरातील विठ्ठल मंदिर, रत्नागिरी येथे गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी श्री अक्कलकोट संस्थान अन्नछत्र यांच्या पालखीचे आगमन होत असून, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता जयस्तंभ येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, दिंडी, पताकाधारक तसेच शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत दुपारी १२ वाजता विठ्ठल मंदिरात दाखल होईल.

दुपारी १२.३० वाजता महाआरती संपन्न होणार असून, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता स्वामींचा सामूहिक अभिषेक सोहळा होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता पालखी पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.

या कार्यक्रमामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, स्वामी पालखी सेवा मंडळातर्फे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा