रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर चंपक मैदानावर लैंगिक अत्याचार

रत्नागिरी, दि. २६ (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयात ट्रेनी नर्स म्हणून प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीआज सकाळी चंपक मैदानावर बेशुद्धावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हि धक्कादायक घटना चंपक मैदान, उद्यमनगर रत्नागिरी येथे उघडकीस आली.सदर तरुणीला बेशुद्ध स्थितीत काही नागरिकांनी पाहिले. त्याची खबर पोलिसांना देण्यात आलेवर पोलिस यंत्रणेने त्वरीत घटनास्थळी धाव घेत सदर तरुणीला तात्काळ रत्नागिरीच्या सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तरुणीकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरुन ती संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरातील असल्याचे उघड झाले. तरुणीवर उपचार झाल्यानंतर ती शुद्धीवर आल्यावर तिने दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोमवारी सकाळी एक तरुणी देवरुख येथून रत्नागिरीमध्ये आली आणि साळवी स्टॉप येथून ती तिच्या निवासस्थानाकडे जात असताना एका रिक्षेत बसली होती. मात्र त्यानंतर ती चंपक मैदान येथे बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या या तरुणीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ती गंभीर जखमी असल्याचं आढळून आलं आहे.

जखमी तरुणी एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. त्यामुळे आपल्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात या सर्व परिचारिका रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जोरदार निदर्शनं केली. या प्रकरणातील संबंधित दोषीला तात्काळ पकडावं आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या परिचारिकांनी केली आहे. यावेळी शहर पोलीस निरीक्षक तोरसेकर हेही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपस्थित होते. आता या प्रकरणांमध्ये शहर पोलीस काय भूमिका घेतात आणि तपास कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या सगळ्या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. शहर पोलीस निरीक्षक तोरसेकर हे घटनास्थळी दाखल झाले असून शहर पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी तपास सुरू असतानाच जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका रस्त्यावर उतरल्या आहेत.

देवरुख परिसरातील असलेल्या या तरुणीला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी दोषीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोमवारी संध्याकाळी रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली.

दरम्यान रत्नागिरी सर्वसाधारण रुग्णालय येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शिवसेना तसेच भाजपा व मनसेचे असंख्य कार्यकर्ते ही एकत्र आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तसेच सर्व स्तरातील लोक, राजकीय पक्ष या घटनेबद्दल सर्व थरातून तीव्र संताप जनक प्रतिक्रिया उमटत असून घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

दरम्यान, तो रिक्षावाला कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेनंतर रत्नागिरीच्या इतिहासात अशा प्रकारची घटना धक्कादायक असून सर्वसामान्य जनतेला सुरक्षा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करणारी घटना आहे.

आणखी वाचा