साडवलीच्या ठाकरे विद्यालयातर्फे सीमेवरील जवानांसाठी यंदाही रक्षा बंधनानिमित्त राख्या पाठवणार!

संगमेश्वर, दि. ०२ : कै सौ मीनाताई ठाकरे माध्य.विद्यालय साडवली तर्फे देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांसाठी दरवर्षीप्रमाणे सलग चौविसाव्या वर्षी प्रशालेच्या वतीने राख्या पाठवल्या जाणार आहेत.

राख्यांचे एकत्रिकरण करून पाठविण्याचे नियोजन नुकतेच करण्यात आले. यावेळी विद्यार्थींनी व मार्गदर्शक शिक्षक श्री. जितेंद्र यादव व मुख्याध्यापक श्री बी. व्ही. नलावडे उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने यांनी कौतुक केले आहे.

आणखी वाचा