रत्नागिरी, दि. २८ (प्रतिनिधी) : लिओ क्लब रत्नागिरीच्या 2024-25 या कार्यकाळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे लिओ श्रेयस रसाळ यांनी आपल्या नेतृत्वातून क्लबला नवा आयाम दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबने झोन, रिजन, डिस्ट्रिक्ट तसेच मल्टिपल स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली. विविध सामाजिक उपक्रमांमुळे क्लबने जिल्ह्यात ठसा उमटवला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण जपण्यासाठी वृक्षारोपण, पाण्याचे महत्व पटवणारे जनजागृती उपक्रम, महिला आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच रक्तदान शिबिर, कर्करोग, दृष्टी संबंधित जनजागृती यांसारख्या विविध उपक्रमांतून त्यांनी तरुणाईला सेवाभावाची प्रेरणा दिली.
या कार्यकाळात लिओ क्लब रत्नागिरीने ‘बेस्ट क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट’ असा मान मिळवला. याचबरोबर श्रेयस रसाळ यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट लिजेंड’ हा मानाचा पुरस्कार नाशिक येथे संपन्न झालेल्या मल्टिपल कन्वेन्शन दरम्यान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते रत्नागिरी जिल्ह्यातील विरळ लिओ अध्यक्ष ठरले आहेत.
संपूर्ण कार्यकाळात त्यांच्या कार्यशैलीची सर्वत्र स्तुती झाली. पुढील 2025-26 वर्षासाठी लिओ शशांक तांबे अध्यक्ष, लिओ साहिल गोरे सचिव आणि लिओ अमन वारीशे खजिनदार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.








