२२ जानेवारी ठाण्यात बारटक्के फाऊंडेशन तर्फे सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रवीण देशपांडे यांना “श्रीराम हिंदू गौरव रत्न सन्मान”

ठाणे, दि. २१ (क्षितिज कदम): ६ डिसेंबर १९९२ रोजी उडालेल्या अयोध्या बाबरी पतन गदारोळात ठाण्याचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रवीण देशपांडे यांना धक्काबुकी झाली व कॅमेराचीही हानी झाली परंतु स्वत:च्या जीवाचा धोका पत्करून, कर्तव्य बजावत बाबरी पतनची घटना चित्रित केली चित्रित केलेले फिल्म रोल आपल्या पायमोजात लपवून आणले आणि या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले.

अयोध्येतील बाबरी पतन या प्रवीण देशपांडे यांच्या छायाचित्रावर धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांनी ६ डिसेंबर १९९२… बाबरी पतन एक दिनदर्शिका प्रकाशित केली यावर फोटोचे शीर्षक होते “हे ज्यांनी केले त्यांचा मला अभिमान वाटतो!” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या कपाळावरची “गर्व से कहो हम हिन्दू हैं!”भगवी पट्टी! आणि बाळसाहेबांची सही.

या दिनदर्शिकेच्या निमित्ताने या छायाचित्राचे छायाचित्रकार प्रवीण देशपांडे यांना सोमवार दि २२ जानेवारी २०२४ रोजी सायं ७ वा क्रांतिवीर चौक, ज्ञानोदय शाळेजवळ, स्वा. सावरकर नगर ठाणे येथे “श्रीराम दीपोत्सवाचे” औचित्य साधून राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या हस्ते “श्रीराम हिंदू गौरव रत्न सन्मान” बारटक्के फाऊंडेशन तर्फे देण्यात येणार आहे. तसेच या दिनदर्शिका विषयात सहभागी असणारे छायाचित्रकार शिरीष साने, पत्रकार नंदकुमार वाघ, विनोद ढगे आणि या दिनदर्शिकेवरील वाक्य व बाळासाहेबांची हुबेहूब स्वाक्षरी करणारे छायाचित्रकार संजय नाईक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.असे आपल्या प्रसिद्धीपत्रकात मा. शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा