युनिसेफ महाराष्ट्र आणि साऱ्याजणी महिला उत्कर्ष संस्था संयुक्तपणे महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर पत्रकारिता करणाऱ्या महिलांसाठी शिष्यवृत्ती जाहीर करत आहे
अर्ज करण्याची मुदत- ७ ऑगस्ट २०२४
वृत्तलेखा २०२४ बद्दल :
महाराष्ट्रात एक वर्षाहून अधिक काळ गांभीर्याने आणि सातत्याने जिल्हा स्तरावर पत्रकारिता करणारी महिला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकते. ही शिष्यवृती पूर्णपणे ऐच्छिक असून यामध्ये कोणतीही आर्थिक व्यवहार असणार नाही. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत आम्ही ६ जिल्ह्यातील २५ महिला पत्रकारांना प्रशिक्षित केलं आहे. आरोग्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन त्यांना लाभलं.
अभ्यासक्रम :
या अभ्यासक्रमात बदलतं तंत्रज्ञान, बातमीदारीच्या नवीन पद्धती आणि महिला आणि मुलांचे आरोग्य याविषयी वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्य आणि माहिती दिली जाईल. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी तयार केलेल्या या विशेष अभ्यासक्रमात महिला पत्रकारांना कौशल्यविकास, संधी याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल.
या शिष्यवृत्तीतल्या सर्व सत्रांना सक्रीय सहभागी होणाऱ्या पत्रकारांना युनिसेफतर्फे प्रमाणपत्र मिळेल. अभ्यासक्रमातील विषयासंबंधी किमान तीन बातम्या, लेख/ व्हिडियो/ पॉडकास्ट सहभागींनी करणं अपेक्षित आहे.
संवादाची भाषा प्रामुख्याने मराठी आणि हिंदी असेल काही अहवाल आणि विदा मात्र इंग्रजी भाषेत असू शकतील.
दोन महिने दर आठवड्याला सकाळी ९० मिनिटांची ८ ऑनलाईन सत्र होतील.
अर्ज करण्यासाठी गुगल फोरम : https://forms.gle/CkqdJqgcLhpLw7AR9
निवडीबद्दल लवकरच मेलवर संपर्क साधला जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क – संयोगिता ढमढेरे – ९४२३५८५५८२








