दि. नंदा पांडुरंग जाधव पुण्यनुमोदन व जलदान विधीप्रसंगी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांचे हृदयस्पर्शी विचार

चिपळूण (आकले), दि. १७– नंदा पांडुरंग जाधव यांच्या पुण्यनुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम आकले येथे भावनिक वातावरणात पार पडला. या वेळी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांनी आई-वडिलांविषयी मनाला भिडणारे विचार व्यक्त केले.

आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, “आई-वडील जिवंत असतानाच त्यांची सेवा, जपणूक आणि सन्मान करणे हेच आपले कर्तव्य. ते नसताना त्यांच्या मोलाची जाणीव होते. त्यांच्या उतारवयात त्यांच्यासोबत वेळ घालवणे हीच खरी पुण्याई आहे.”

बदलत्या काळातील परंपरांविषयी बोलताना त्यांनी जुन्या पिढीतील पदरधारी महिलांची आठवण करून दिली. पदर हा फक्त वस्त्राचा भाग नसून नीतिमूल्यांचा, आदराचा आणि संस्कारांचा वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक काळात ही प्रथा कमी होत असली तरी त्या पदरामागील संस्कार मनात कायम राहिले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला समाजकल्याण माजी सभापती मनहोर मोहिते, सिद्धार्थ जाधव, दीपक जाधव, धम्मपाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पारंपरिक पदर परिधान केलेल्या महिलांचे छायाचित्रही कार्यक्रमातील भावनिक क्षण ठरले. कार्यक्रमाची व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा – ग्रामशाखा आकले यांनी केली.

आणखी वाचा