लांजा, दि. २१ : लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी महायुतीने दणदणीत विजय मिळवला. नगराध्यक्षपदी शिवसेना महायुतीच्या सावली सुनील कुरूप यांनी १९८४ मताधिक्याने बाजी मारली.
नगरसेवक पदाच्या १७ पैकी १० जागा महायुतीच्या विजयस्थानी ठरल्या. यामध्ये शिवसेनेच्या ९ आणि भाजपच्या १ उमेदवारांनी यश संपादन केले. उर्वरित सहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी ठरले, तर शिवसेना उबाठा पक्षाला केवळ एकमेव जागेवर समाधान मानावे लागले.
नगराध्यक्षपदी सावली सुनील कुरूप यांनी ४६७४ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी पूर्वा मुळे (महाविकास आघाडी) २६९० आणि प्रियांका संजय यादव २६४० मते मिळवली.
नगरसेवक पदासाठी एकूण ५७ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये प्रभागानुसार:
प्रभाग १: निधी गुरव (शिवसेना) – ३७० मत
प्रभाग २: पंढरीनाथ माय शेट्ये (शिवसेना) – ३९२ मत
प्रभाग ३: श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना) – २६७ मत
प्रभाग ४: सुशीला कांबळे (शिवसेना उबाठा) – २२४ मत
प्रभाग ५: सिद्धेश भोवड (अपक्ष) – ४२७ मत
प्रभाग ६: योगेश कावतकर (शिवसेना) – २६४ मत
प्रभाग ७: प्रांजल यादव (शिवसेना) – १६५ मत
प्रभाग ८: मिलिंद लांजेकर (अपक्ष) – २४४ मत
प्रभाग ९: रफिक नाईक (अपक्ष) – ३८९ मत
प्रभाग १०: प्रणाली तेली (भाजप) – २६९ मत
प्रभाग ११: नीलिमा कनावजे (शिवसेना) – २७६ मत
प्रभाग १२: वंदना काडगाळकर (अपक्ष) – २५१ मत
प्रभाग १३: साक्षी मानकर (शिवसेना) – ३५७ मत
प्रभाग १४: वैभव जोईल (शिवसेना) – ३०२ मत
प्रभाग १५: मनोहर बाईत (शिवसेना) – २३६ मत
प्रभाग १६: अनिल गुरव (अपक्ष) – ४२६ मत
प्रभाग १७: नेहा राडये (अपक्ष) – ४०४ मत
निवडणूक लक्षवेधी ठरली आणि तिन्ही गटांमधील तिरंगी लढतीमुळे तालुक्याच्या नागरिकांचे लक्ष संपूर्णपणे या निवडणुकीकडे लागले. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या विजयानंतर महायुतीची पकड मजबूत झाली असून, अपक्ष उमेदवारांनीही काही प्रभागात जोरदार प्रदर्शन करून इतिहास घडवला.








