महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी अपूर्वा किरण सामंत यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी, दि. ०३ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या सदस्यपदी संभाजीराजे आणि अपूर्वा किरण सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व आणि नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात सुरू आहे.

अपूर्वा सामंत या राज्याचे उद्योग मंत्री तथा आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्चशिक्षित व तरुण उद्योजक म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक तसेच उद्योजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील उदयोन्मुख युवक-युवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेषतः कोकण पट्ट्यातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ मिळावे, स्थानिक पातळीवर क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सुविधा तसेच स्पर्धांची संख्या वाढावी, यासाठी अपूर्वा सामंत यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे कोकणातील युवा शक्तीला चालना मिळून महाराष्ट्र क्रिकेटच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळेल, असे मत विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा