लवेकर मोटर्सच्या नव्या ‘एलसीव्ही’ शोरूमचे उत्साहात उद्घाटन

रत्नागिरी, दि. २५ : शहरातील जे. के. फाईल्ससमोर अशोक लेलँडच्या लाइट कमर्शियल व्हेईकल (एलसीव्ही) विभागाच्या ‘लवेकर मोटर्स’ या नव्या शोरूमचे उद्घाटन गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. अशोक लेलँडचे बिझनेस हेड विप्लव शहा यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अशोक लेलँडचे झोनल मॅनेजर अतुल क्षीरसागर, रिजनल मॅनेजर गौरव ठाकरे, एरिया सेल मॅनेजर अभिषेक नाडकर्णी, सुनील पाटील, अखिलेश चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अशोक लेलँडच्या समाधानी ग्राहकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उद्घाटन सोहळ्यास आरटीओचे अधिकारी शेखर लवेकर, प्रकाश मयेकर, सचिन शिंदे, दैवज्ञ पतपेढीचे विजय पेडणेकर, संतोष भुर्के, प्रमोद खेडेकर, करसल्लागार उज्ज्वल बापट, वरुण फडके, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक सुधाकर गोन्नाडे, प्रदीप गायकवाड तसेच विविध बँका, फायनान्स आणि विमा कंपन्यांचे अधिकारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लवेकर मोटर्सचे संचालक संदीप लवेकर, श्रेयस लवेकर, कुणाल लवेकर, रश्मी लवेकर, राजेश्वरी पातकर आणि अनुरूप पातकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

उद्घाटनाच्या निमित्ताने १५ ग्राहकांना नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थितांनी लवेकर मोटर्सच्या या नव्या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा