गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजप युवा मोर्चाचा पुढाकार; भरणे नाका येथे मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत चहा-नाश्त्याची सुविधा

खेड, दि. १३ : गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांची सेवा करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा खेडच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावरील अपोलो टायर्स, भरणे नाका येथे मोफत चहा-नाश्त्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने कोकणवासीय आपल्या वाहनांनी गावी येत आहेत. लांबचा प्रवास करताना गणेशभक्तांना काही काळ विश्रांती घेता यावी आणि चहा-नाश्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले असून, गणेशोत्सवाच्या कालावधीत या उपक्रमाचा लाभ कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांना मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, तालुका उपाध्यक्ष अविराज मोरे, शहराध्यक्ष स्वराज गांधी, ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संदेश भुवड, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, शहर चिटणीस अनिकेत पवार व राकेश चव्हाण, शहर सरचिटणीस विजय गुप्ता, युवा मोर्चा शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, महेश मुंडेकर, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व वाढले आहे. भाजप युवा मोर्चाच्या या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

आणखी वाचा