चिपळूण, दि. २० (प्रतिनिधी): शिवकालीन नाणी संग्रहाता छंद जोपासणाऱ्या शहरातील खेंड येथील गौरव शेखर लवेकर याने गेल्या १० वर्षाच्या कालावधीत सुमारे ८०० शिवकालीन नाण्यांचा संग्रह केला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवास करून त्याने या नाण्यांचा शोध घेत संग्रहीत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेकास साडेतिनशे वर्षे पुर्ण झाल्याने महाराष्ट्र सरकारने मराठा साम्राजाचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मीती केली. या पुस्तकात सर्वोत्तम ४ डॉटेड शिवराई ची नाण्यांची छायिचत्रे निवडण्यात आली. या चार नाण्यांमध्ये तिन नाणी ही गौरव संग्रहीत केलेली आहेत.
गौरव शेखर लवेकर यांचे आजोबा प्रसिद्ध मुर्तीकार. त्यांच्या पश्चात शेखर लवेकर हे सुवर्णलंकाराचा व्यवसाय सांभाळत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या घडणावळीमुळे लवेकर कुटुबियांच्या घरी विविध प्रकारची नाणी यायची. यातूनच गौरवला नाणी संग्रहाची आवड निर्माण झाली. यातूनच त्याने २०१४ पासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नाणी संग्रह करण्यास सुरवात केली. शिवकालीन, ब्रिटीश, मुघल, तसेच संस्थानिकांची नाणी देखील त्याने संग्रहीत केली आहेत. शिवकालीन नाणी संग्रह करण्याचा त्याला फार आवड आहे. यासाठी गेल्या १० वर्षाच्या कालावधीत पंढरपूर, सांगली,
गौरव लवेकर
सातारा, कराड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी प्रवास केला. पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरे, तिर्थक्षेत्राना त्याने भेटी दिल्या.
शिवकालीन प्राचीन इतिहासाचा त्याचा दांडगा अभ्यास आहे. सातत्याने त्याचे हे वाचन सुरू असते. मुंबई कॉईन सोसायटीचा तो अध्यक्ष देखील आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराई नाण्यांची निर्मिती झाली. या कालावधीतील अनेक नाणी त्याने संग्रहीत केलेली आहेत. दुदांडी शिवराई, बिंदूमय रायगडी शिवराई (डॉटेड), हाफ डॉटेड शिवराई, तंजावर शिवराई, लेटर शिवराई आदींचा यात समावेश आहे.
१८३० नंतरच्या ब्रिटीश काळातील नाण्यांचा देखील संग्रह त्याने जपला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकेला ३५० वर्षे पुर्ण झाली. शिवाय भारत देश अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. याअनुषघाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतीक विभागाकडून मराठा साम्राज्याचे चलन या कॉफीटेबल बुकची निर्मीती करण्यात आली. शिवकालीन नाण्यांची लोकांना माहिती मिळावी. यासाठी हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
दिल्ली येथे लाल किल्ल्यात दिवाणीखाण मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. या पुस्तकासाठी राज्यभरातून नामवंत तज्ञ आणि नाणी संग्रहकांनी नाणी पाठवली होती. शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागातील दर्शिनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव लेखक, डॉ. दिलीप बलसेकर यांनी राज्यभरातील नाणी संग्रहकांकडून नाण्यांची छायाचित्रे जमवली. त्याने सकंलीत केलेल्या नाण्यांचे छायाचित्र मराठा साम्राज्याचे चलन पुस्तकात सहभागी झाल्याने त्यांचे शहरपरिसरातून विशेष अभिनंदन केले जात आहे.