रत्नागिरी, दि. १७ : Central Board of Secondary Education (CBSE) च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात आदित्य पटवर्धन याने 99.4 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने गणित विषयात 95 तर विज्ञान विषयात पूर्ण 100 गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आदित्य हा साठे क्लासेसचे महेश साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत असून त्याच्या या यशामुळे साठे क्लासेसचा शैक्षणिक दर्जा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
यावर्षी साठे क्लासेसचे एकूण आठ विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. त्यामध्ये कु. न्यासा पेडणेकर हिने 98.6 टक्के गुण मिळवले असून गणितात 95 आणि विज्ञानात 99 गुण मिळवले आहेत. कु. पूर्वा चव्हाण हिला 98 टक्के गुण मिळाले असून तिने गणितात 95 आणि विज्ञानात 97 गुण मिळवले आहेत. कु. शायन मुजावर याला 93.6 टक्के गुण मिळाले असून गणितात 95 आणि विज्ञानात 91 गुण प्राप्त झाले आहेत.
तसेच कु. कुलदीप देशमुख (96.2%) याने गणित व विज्ञानात प्रत्येकी 95 गुण मिळवले आहेत. कु. पार्थ झोरे (95.4%) याने गणितात 87 व विज्ञानात 92 गुण मिळवले आहेत. कु. श्रीयस विलणकर (95.6%) याने गणितात 84 व विज्ञानात 94 गुण मिळवले आहेत. कु. अर्चित रेडीज (94.6%) याने गणितात 80 व विज्ञानात 93 गुण मिळवले आहेत. कु. स्वरा कांबळे (91.8%) हिने विज्ञान विषयात 90 गुण मिळवले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी विषयांमध्ये 100 पैकी गुण मिळवत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. यावर्षी Podar International School चे पहिले तीन विद्यार्थी तसेच सर्वंकष विद्या मंदिराचा तिसरा टॉपर हे साठे क्लासेसचे विद्यार्थी असल्याचे विशेष ठरले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या मेहनतीसह शिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक केले जात आहे.








