रत्नागिरी नगरपरिषदेचे कर्मचारी निनाद खानविलकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी, दि. ०१ (प्रतिनिधी): रत्नागिरी नगर परिषदेच्या वित्त विभागात काम करणारे निनाद खानविलकर यांचे आज मुंबई मध्ये उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
निनाद याच्या निधनाची बातमी समजताच रत्नागिरी नगर परिषदेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

निनाद खानविलकर यांचा परटवणे रोड येथील फिनोलेक्स कॉलनी समोर काही महिन्यापूर्वी अपघात झाला होता हा त्याचा दुसऱ्यांदा अपघात होता. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेला असताना अज्ञात गाडीने उडवल्याची घटना घडली होती. त्यांना तात्काळ ट्रीटमेंटसाठी कोल्हापूरला हलवण्यात आले होते. कोल्हापुरातून त्याला मुंबई ला हलवण्यात आले होते. त्यानंतर थोडा बरा झाल्यावर त्याला रत्नागिरी त्याच्या घरी आणण्यात आले होते काही दिवस तो चांगला होता.

परंतु काही दिवसापूर्वी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला मुंबईला उपचारासाठी परत हलवण्यात आले होते. परंतु आज दि. ०१ एप्रिल रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आहे.
निनाद खानविलकर हे रत्नागिरी नगरपरिषदेचे उत्तम कर्मचारी होते व सगळ्यांना सहकार्य करणारे मनमिळावू व सतत हसत राहणारा असे वेक्तीमत्व आपल्यातून गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
निनाद खाविलकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुले आई इ. असा परिवार आहे.

आणखी वाचा