तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत करणार – तालुकाध्यक्ष सुनिल जाधव

गुहागर, दि. ०३ (प्रतिनिधी):  तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गावभेट दौरे सुरू असून याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण तालुका फिरून आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत करणार असल्याचे वंचित चे तालुकाध्यक्ष सुनिल जाधव यांनी सांगितले.

      वंचित बहुजन आघाडीला गुहागर तालुक्यात सुनिल जाधव (माजी सैनिक) यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळाल्याने लोकांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पद मिळाल्यापासून सुनिल जाधव यांनी गावभेट दौरे आयोजित करून आपल्या पदाधिकाऱ्यांसह ते प्रत्येक गावागावात पोहोचत आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात, अडीअडचणीत ते धावून जात असल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झालेली दिसून येते. एकंदरीत त्यांच्यामुळे तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असलेली दिसते. वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी पाहिली तर सर्व समाजातील प्रमुख व्यक्ती यामध्ये आहेत. ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी नेतृत्व पाहून सर्वच समाजातील सुशिक्षित वर्ग देखील मोठ्याप्रमाणात वंचित कडे वळला असल्याचे चित्र दिसत आहे.
      नुकतीच तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे  ॲड.बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेवून आल्यानंतर तालुक्यात जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे विचार, भूमिका पोहचवून लोकांना ती पटवून सांगणार असून तालुक्यात वंचित चे संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचेही सुनिल जाधव यांनी सांगितले. एकंदरीत तालुक्यामध्ये अशाप्रकारे वंचित ची ताकद वाढली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये येथील प्रस्थापितांसमोर एक मोठे आव्हान उभे राहणार हे निश्चित आहे.

आणखी वाचा