वसंतराव लाड यांच्यासारखे व्यक्तिमत्व आम्हा कोकणातील लोकप्रतिनिधींना नेहमीच आदर्शवत ठरेल : विनायक राऊत

चिपळूण, दि. ०७ (प्रतिनिधी): कर्तुत्व किती श्रेष्ठ असतं आणि त्या कर्तुत्वाने  साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळवता येतो हे वसंतराव लाड यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालय. वसंतराव लाड यांच्यासारखे व्यक्तिमत्व आम्हा कोकणातील लोकप्रतिनिधींना  नेहमीच आदर्शवत ठरेल. सी.ए वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्ट हा सर्वांना जीवनदायी ठरेल अशी प्रतिक्रिया माजी खासदार तथा उबाठा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी व्यक्त केली. गेली अनेक वर्षे सामाजिक शैक्षणिक क्रीडा व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारे, दुबई येथील सी.ए उद्योजक वसंतराव लाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चिपळूण तालुक्यातील अलोरे गावी सुरू झालेल्या सी.ए वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्टचा उद्घाटन सोहळा अलोरे येथील करणूक केंद्र सभागृहात गुरुवारी मोठ्या थाटात संपन्न झाला शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते या ट्रस्टचे उद्घाटन करण्यात आले.
  या सोहळ्याला  शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रशांत यादव, माजी आमदार सुभाष बने, माजी सभापती धनश्री शिंदे, चिपळूण संगमेश्वर शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम, संगमेश्वरचे माजी सभापती दिलीप सावंत, उद्योजक वसंतराव लाड, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सध्याच्या या जगामध्ये, युगामध्ये राजकारणामध्ये ओरबडणारे खूप असतात दाम दुप्पट वसूल करणारे खूप असतात पण परोपकारी वृत्ती मनामध्ये ठेवून ज्या जन्मभूमीने आपल्याला जन्म दिला त्या जन्मभूमीचे ऋण मनामध्ये ठेवून मिळवलेल्या संपत्तीचा वाटा जन्मभूमीसाठी ठेवून लोकोपयोगी करणं हे केवळ केवळ वसंतराव लाड यांच्यासारख्याच व्यक्तिमत्त्वालाच सिद्ध होतं कारण देण्याची वृत्ती असायला पाहिजे घेण्यासाठी आपण ज्या पद्धतीने पुढे पुढे जातो त्याच पद्धतीने घेत असताना देण्याची सुद्धा वृत्ती असली पाहिजे त्या देण्यातून खऱ्या अर्थाने आपले जीवन सार्थकी लागतं हे आपल्या साधू संतांनी सांगितले आहे.वसंतराव लाड यांच्या रूपाने आपल्याला हे जे सोनं मिळालं आहे ते सोनं हिरा आहे त्या हिऱ्याची जपणूक करा त्यांचा आदर्श अमलात आणा त्यांचा सेवा कार्यखंड कमी पडू देऊ नका वसंतराव लाड आपल्यासारखे  अनेक दातृत्व करणारे निर्माण व्हावेत आणि त्यांना आपले मार्गदर्शन लाभावे अशी प्रार्थना करतो आपली वाटचाल प्रेरणादायी ठरेल अशी इच्छा व्यक्त करतो तुमच्या या दातुत्वाबद्दल आणि वैचारिक श्रीमंतीबद्दल आदर करावा तेवढा कमीच आहे . आपले हे सेवाकार्य असेच अखंडपणे सुरू राहो अशी सदिच्छा माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात बोलतांना व्यक्त केली.
       वसंतराव लाड जे काम गेले ३५ वर्ष अतिशय तळमळीने समर्थपणे करतच आले आहेत आता याच कामाला फक्त ट्रस्टच्या रूपाने आकार ,उकार देण्याच्या कामाला आजच्या दिवशी नव्याने सुरुवात आहे. एखाद्या छोट्याशा गावात इथल्या जिल्हा परिषद, इथल्या माध्यमिक शाळा शिक्षण घेऊन सी.ए सारख शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आज सीए परीक्षेत पास होणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि अशावेळी त्या काळात त्यांनी सी.ए ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनात अतिशय चांगले नाव कमावले आणि म्हणून आपण हे नाव कमवत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो समाजाच्या प्रति असणारे ऋण कुठे ना कुठेतरी आपल्याला फेडायला पाहिजेत यासाठी थोडाफार समाजकार्यात हातभार लावावा या उद्देशाने वसंतराव लाड यांनी आरोग्य सुविधा असो की शैक्षणिक सुविधा एखाद्या गरिबाला त्याच्या आवश्यकतेनुसार मदत करणे ही त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून भूमिका बजावण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या कार्याला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो अशा शब्दात आमदार शेखर निकम यांनी सी.ए वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्ट उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात बोलताना शुभेच्छा दिल्या.
पैशाच्या अभावी एखादा गरीब शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आमचे सतत प्रयत्न असतात सीए वसंतराव लाड ट्रस्टच्या वतीने यापुढे भविष्यात मुलांचे शैक्षणिक काम आरोग्य सुविधा महिला सक्षमीकरण या सर्व गोष्टींवर जोर देऊन काम केले जाणार आहे.कोण कोणत्याही पक्षाचा असो समाजाचा असो जो येईल मदतीच्या अपेक्षेने त्याला मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वोत्परी प्रयत्न करणार आहोत.मी जरी दुबईमध्ये असलो तरी आमच्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी येथे बारकाईने लक्ष ठेवून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. अत्यंत गरजू, गरीब, गरजवंत लोकांनी थेट आमच्याशी संपर्क करावा आम्ही मदतीला सदैव सेवेत आहोत. असे सी.ए वसंतराव लाड ट्रस्टचे सर्वेसर्वा दुबईतील उद्योजक वसंतराव लाड यांनी आपल्या ट्रस्ट विषयी माहिती देताना आपल्या मनोगतातून सांगितले.वसंतराव लाड आपल्या उद्योग व्यवसायानिमित्त दुबईमध्ये जरी असले तरीही त्यांची नाळ कोकणच्या मातीशी जुळली आहे.
आपण समाज व्यवस्थेतून मोठा झालो त्या समाजाप्रती आपल्याला काही करायला हवे याची मला जाणून ठेवून समाजातील गोरगरीब आणि वंचित लोकांसाठी गेले अनेक वर्ष ते काम करीत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणातून सांगितले.माजी आमदार सुभाष बने यांनीही आपल्या भाषणात ट्रस्टला शुभेच्छा देऊन लाड यांच्या कार्याचे कौतुक केले.शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे यांनी लाड यांच्या एकंदरीत जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकीत ट्रस्टच्या कार्यपद्धतीबद्दल उपस्थितांना माहिती दिली.चिपळूण पंचायत समिती माजी उपसभापती श्री. सूर्यकांत खेतले,अलोरे हायस्कुल प्राचार्य श्री. वाचासिद्ध, प्राचार्य श्री. माने. राकेश शिंदे, बळीराम गुजर, राजाभाऊ नारकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निलेश कदम, जयवंतराव शिंदे, भैया कदम. दिप्ती सावंत -देसाई. प्रशांत मुळ्ये, पल्लवी चव्हाण, सुप्रिया शिंदे, बाळासाहेब शिंदे, सी. ए.वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्टच्या अलका लाड, उपाध्यक्ष परीक्षित लाड,ट्रस्टचे सचिव प्रसाद लाड,ट्रस्टी केतन लाड, ट्रस्टी  सुरज लाड,  मोहन चव्हाण,  परशुराम मोहिते,निलेश चावरे, अनिल जाधव,  अनंत जाधव, किरण गुप्ता. तुकाराम मोहिते, रमजान कडवईकर. जमीर कडवईकर, कमाल कडवेकर,अहमद कुंभार्लीकर. शमशुद्दीन चिपळूणकर,  विनायक सकट,  अभिजित कांबळे  अमित आरवट, शुभम मोहिते.तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले तर रमजान कडवई कर यांनी उपस्थिताचे आभार मानले.

आणखी वाचा