आरक्षित तिकीटांबाबतीत होणाऱ्या काळाबाजाराची योग्य चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता विलास राऊत यांच्याकडून कोकण रेल्वेला निवेदन

रत्नागिरी, दि. ११ (प्रतिनिधी): गणेशोत्सव, शिमगा व इतर सण तसेच मे मधील सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाण्यांसाठी चाकरमानी कोकण रेल्वेने प्रवासाला प्रथम प्राधान्य देतात.
परंतू अनेक चाकरमानी सणासुदीकरीता आपल्या गावी जाण्यासाठी चार महिने अगोदर आरक्षित तिकीट मिळविण्याकरीता तासंतास रांगेत उभा राहूनही सामान्य जनतेला मात्र तिकीट प्रतिक्षा यादीतील मिळते आणि अनेक प्रयत्न करुनही शेवटपर्यंत तिकीट प्रतिक्षा यादीतच राहते. गावी जाण्यासाठी पर्याय म्हणून नाईलाजाने खाजगी वाहनांना १० पटीने भाडे देऊन प्रवास करावा लागतो. गणेशोत्सवाकरीता चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासन कोकणाकरीता अनेक गाडया सोडतात. परंतू त्या गाडयांचे तिकीट आरक्षण सुरु होतास अवध्या काही सेकंदात तिकिटांचे आरक्षण फुल होऊन हजाराच्या वर प्रतिक्षा यादी जाते, ही बाब सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत आश्चर्यजनक वाटते. असा प्रकार गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासन आणि रेल्वेचे एजन्ट मिळून काळाबाजार करत असल्याचे सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मनात शंका निर्माण आहे. त्यामूळे सामान्य चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी आपणं जातीने लक्ष घालून आरक्षित तिकीटांबाबतीत होणाऱ्या काळाबाजाराची योग्य चौकशी करुन त्वरीत कठोर कारवाही करण्याचे आदेश दयावेत अशी विनंती निवेदनामार्फत सामाजिक कार्यकर्ता श्री. विलास गोपाळ राऊत यांनी केली आहे.
तसेच कोकण मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या व जलद गाडयांना सणासुदीच्या काळामध्ये मुंबईपासून कोकणापुरते काही डब्बे आरक्षित ठेवण्यात यावेत, त्या गाडयांना पनवेल, रत्नागिरी ते थेट मडगाव येथे थांबत असल्यामूळे इतर मधल्या स्थानकांतील प्रवाशांना प्रवास करता येत नाही, तरी किमान रत्नागिरी पासून सावंतवाडी पर्यंत सर्व गाडयांचे थांबे वाढवावेत असे हि त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

आणखी वाचा