दापोली, दि. ११ (प्रतिनिधी): आमदार योगेश कदम यांचे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडून योगेश कदम व त्यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या फोटोवर छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .. दापोली खेड या भागावर टाळसुरे परिसरात हा प्रकार घडला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राज्यमार्गावरच रस्ता रोको करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे ऐन गणेशोत्सवात दापोलीत वातावरण तापले आहे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करत अशाप्रकारे बॅनर जवळ छेडछाड करणाऱ्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा बॅनर बाजूला केला शिवसेनेकांनी त्या ठिकाणी दुसरा बॅनर लावला आहे.
मात्र ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांनी निधड्या छातीने हिंमत असेल तर दिवसाढवळ्या आमच्या समोर यावं आहे तो हात खांद्यापासून काढण्याची तयारी शिवसैनिकांमध्ये आहे असाही थेट इशाराच शिवसेनेचे युवा नेते निलेश शेठ यांनी दिला आहे गौरी गणपतीचा सण आहे आज गौरी पूजन आहे म्हणून आम्ही हे आंदोलन आज कोणालाही त्रास होऊ नये म्हणून थांबवत आहोत मात्र पोलिसांनी संबंधित रात्रीच काळ वृत्त करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी आणि अशी कुत्ते करून आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना व तालुक्यात अशांतता मजेत असा प्रयत्न करण्याच्या कारस्थानांना आम्ही बळी पडणार नाही असे शब्द निलेश शेठ यांनी सुनावला आहे पण जो कोणी आहे तो आमच्या समोर येईलच आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचूच असाही इशारा शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी व युवा सैनिकांनी दिला आहे.
आमदार योगेशदादा कदम यांच्या सौभाग्यवतींच्या फोटोची करण्यात आली विटंबना
दरम्यान दापोली-खेड-मंडणगड तालुक्याचे आमदार योगेशदादा कदम यांच्या गणेशोत्सव शुभेच्छा बॅनरवरील त्यांच्या सौभाग्यवतींच्या फोटोचे विडंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ दापोली खेड रस्त्यावर टाळसूरे वाकण येथे शिवसेना नेते निलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आले.
अज्ञाताने काल रात्री शुभेच्छा बॅनर फाडून विटंबना केल्याचे आज लक्षात आल्यानंतर त्या विकृत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी टाळसूरे येथे रस्ता रोको करण्यात आले. यामुळे वहातूकीचा काही काळ खोळंबा झाला होता. पोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यानंतर निलेश शेठ यांनी कार्यकर्त्यांसह दापोली पोलीस स्थानकात या बाबत निवेदन सादर केले. गौरी विसर्जनानंतर तालुकाभर या कृत्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती निलेश शेठ यांनी दिली