सिंधुदुर्गात एसटी बसची कंटेनरला धडक

सिंधुदुर्ग, दि. १५ (प्रसाद रानडे): 
मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. नेहमीप्रमाणे कसाल कसाल डेपो मधून एसटी बस ही मुंबई गोवा महामार्गावरून कोल्हापूर -तुळजापूर दिशेने जात होते. ही एसटी बस सर्विस रोड वरून मुख्य रस्त्यावर येत असताना समोर उभा असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली आहे. या एसटी बस मधुन जवळपास 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. एक 26 प्रवासी जखमी झाले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार ,मालवण आगाराची एसटी बस मालवण ते कोल्हापूर तुळजापूर नेहमीप्रमाणे मार्गक्रमाला निघाली होती. ही मालवण एसटी बस कसाल आगारातून कोल्हापूर तुळजापूर या या दिशेने जात असताना एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर उभा असलेल्या कंटेनरला मागून एसटीने जोरदार धडक दिली अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवासांना ओरोस जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे त्यांच्या वरती योग्य तो उपचार सुरू आहे.
यातील बस चालक शंकर अशोक टक्के वय 35 राहणार मालवण हे आपल्या ताब्यातील मालवण एसटी बस डेपोची बस मालवण ते कोल्हापूर अशी 35 ते 40 प्रवासी घेऊन जात असताना एसटी बसचा स्टेअरिंग फेल झाल्यामुळे त्यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस समोर ऑइल लिकेजमुळे बंद असलेल्या कंटेनरला ठोकर दिल्याने अपघात घडला. सदर अपघातात एस टी कंडक्टर 1. संतोष रामकृष्ण मांजरेकर वय 57 वर्षे राहणार मालवण, 2. विजया विष्णू गावडे वय 60 राहणार नांदोस ,3. प्रियांका निलेश दुधवडकर वय 32 राहणार दांडी मालवण,4. त्रिशा निलेश दुधवडकर वय .9, 5. पराग रवींद्र माने वय 50 राहणार गवंडी वाडा मालवण ,6. योगेश दत्ताराम सुर्वे वय .38 राहणार मालवण ,7. भक्ती भगवान नकाशे वय ४४ राहणार अंब्राड ,8. चिमणा चंद्रकांत भाबल वय 29 राहणार तिरलोट,देवगड,9. सुषमा भिवा वांयगणकर राहणार वायंगणी,10. स्नेहलता सूर्यकांत केरकर वय 64 राहणार मसुरे,11. राजाराम साबजी पार्टे,12. अनिता अरुण घाडीगावकर वय 59 राहणार कुसाबे,13. वीरेंद्र पंढरीनाथ भगत वय 46 राहणार कसाल,14. श्रीकृष्ण भगवान मिस्त्री वय 42 राहणार कसाल, 15. लावण्या राहुल अपराज वय 44 16. धनिका मारुती शिंदे वय.22 राहणार कसाल,17. रवींद्र तुकाराम सुतार वय 75 राहणार कुणकवळे,18. नयना नारायण वालावलकर वय 55 राहणार सुकळवाड,19. शुभांगी श्रीकृष्ण मेस्त्री,20. चेतन दयानंद सुतार वय. 24 राहणार कुणकवळे,21. श्रद्धा रघुनाथ सुतार वय 36 राहणार कुणकवळे,22. रघुनाथ रवींद्र सुतार वय 40 राहणार कुणकवळे,23. पवन रवींद्र माने वय 10 राहणार मालवण,24. धनश्री धनाजी नाईक वय 45 राहणार पोईप,25. धनश्री दिगंबर नाईक वय.52, राहणार पोईप,26. विजया विष्णू गावडे वय.60, राहणार नांदोस मालवण यांना किरकोळ दुखापती झाल्या.त्यांना पोलिस सरकारी वाहन,प्रायव्हेट कार,तसेच 108 ॲम्ब्युलन्स ने ओरोस जिल्हा रुग्णालय येथे तीन रुग्णांना कसा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलीस प्रशासनाकडून या अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.

आणखी वाचा