राजापूर, दि. २१ (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षापासुन राजापूर शहरातील राजापूर हायस्कूल ते जवाहर चौक या भागात वाहतुक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच जवाहर चौकापासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सुपर बाजारसमोर सातत्याने मालवाहु गाड्या रस्त्यात आडव्या लावुन वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात येत असताना देखील राजापूर पोलिस हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन राहत असल्याने या सुपर बाजारवर राजापूर पोलिसांचे एवढे प्रेम का ? असा सवाल जनसामान्यान्मधुन विचारण्यात येत आहे.
तिव्र उताराचा अरुंद रस्ता व त्यातच अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने वाहतुक कोंडीचा जटील प्रश्न निर्माण होतो. सातत्याने या मार्गावर वाहतुक कोंडी होवुन सर्वसामान्याना चालणेही मुश्किल बनते . या वाहतुक कोंडीचा प्रश्न प्रश्न सुटावा यासाठी राजापूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत वाहतुक पोलिसही या ठिकाणी कायम तैनात ठेवलेला असतो. मात्र एका अनधिकृत शेडमध्ये एका अनधिकृत खुर्चित बसुन असणाऱ्या या पोलिसाना झालेल्या वाहतुक कोंडीशी काहीही देणे घेणे नसल्याच्या प्रतिक्रिया कायम जनसामान्यान्मधुन उमटत असतात.
राजापूर शहरात कर्तव्यावर असणारे वाहतुक पोलिस शहरातील गर्दीच्या ठिकाणची वाहतुक कोंडी सोडवण्याऐवजी शहराबाहेरील रस्त्यावर निर्जन ठिकाणी उभे राहुन नक्की कोणती वाहतुम कोंडी सोडवत असतात असा प्रश्न जनसामान्याना गेल्या काही वर्षापासुन पडला असुन अद्यापही तो अनुत्तरीत आहे.
त्यातच शहरातील सुपर बाजारचे मालक आपला आलेला माल उतरवुन घेण्यासाठी कायम गर्दीच्या वेळी आलेली ट्रक रस्त्यात आडवे लावुन तासंतास माल उतरवुन घेण्याचे काम करत असतात. हे ट्रक कायम अर्ध्या रस्त्यात असल्याने समोरासमोर दोन एस्टी बस आल्यास वाहनांची रांगच राग दोन्ही बाजुला लागते . त्यातच शहरात जाण्यायेण्यासाठी मुख्य रस्ता हा एकच पर्याय असल्याने वाहन चालकाना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात.
सातत्याने या सुपर बाजार समोरील बेकायदा वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सुपर बाजारच्या माल वाहतुक गाड्या मात्र राजापूर पोलिसानी डोळ्यावर पट्टी बांधल्याने दिसत नसाव्यात असा कयास सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केला जात आहे . या सुपर बाजार वर राजापूर पोलिसांचे इतके प्रेम का? याचे उत्तर मात्र राजापूर पोलिसानाच माहित असावे अन्यथा सुपर बाजारवर कारवाइचा बडगा उचलण्यास राजापूर पोलिस का कचरतात याबाबत राजापूरवासियान्मधु अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.