अरे योजना आम्ही बंद करू म्हणता काय तुमच्या बापाची आहे का ; अजितदादा काँग्रेसवर भडकले

चिपळूण, दि. २१ (प्रतिनिधी): 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे योजना बंद करावी म्हणून हे कोर्टात जातात इतकच नाहीतर काँग्रेसलाही सुनावताना ही योजना तुमच्या बापाची आहे का अशा शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या योजनेतून महिला भगिनींनी व्यवसाय सुरू केले गोरगरिबांना आम्ही मदत केली कॉंग्रेस वाले म्हणतायत आम्ही बंद करू अरे काय तुमच्या बापाच्या घरचे आहे का मला बाप काढायचा नव्हता पण त्यांना विचारायचे आहे तुमच्या वडिलांच घरच आहे का  असाही संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जलसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार चिपळूण येथे बोलत होते
त्यावेळी व्यासपीठावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे,शिल्पा बेलोसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चिपळूणसाठी मोठी घोषणा
चिपळूण येथील महापुराचा प्रश्न संदर्भात रेड व ब्लू लाईन यासाठी कोल्हापूरच्या धर्तीवर दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा  आपण तयार करण्याच काम सुरू केल आहे लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. नवीन पर्यटन धोरण आणले आहे त्याचा उपयोग कोकणासाठी व्हावा यासाठी हे धोरण आणले आहे, कराड चिपळूण महामार्गाचा प्रश्न, चिपळूण कराड रेल्वे मार्ग असेल या मार्गालाही गती देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची घोषणा अजितदादांनी चिपळूण येथील कार्यक्रमात बोलताना केली. पूर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.जनसन्मान यात्रेवेळी ते चिपळूण येथे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोल्हापुर , सांगली असेल त्या ठिकाणी पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र क्लायमेट रिझलिंग डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या महत्वकांशी प्रकल्पात जागतिक बँकेने मंजुरी देत पहिल्या टप्प्यामध्ये 4000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याच धर्तीवर चिपळूणच्या पूरनियंत्रणासाठी जलसंपदा विभागाकडून दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे लवकरच यासाठी आपण बैठक लावणार आहोत. यामध्ये माझं व आमदार शेखर निकाम यांचे लक्ष आहे असं आमदार शेखर निकम यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केलं.
या पुढील काळात या परिसरात कारखानदारी आली पाहिजे येथील तरुण-तरुणींना काम मिळायला हव नवीन पर्यटन धोरणाचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. मी शब्दाचा पक्का आहे त्यामुळे काळजी करू नका अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत हे सगळे प्रश्न मार्गी लागतील असाही शब्द अजितदादांनी या कार्यक्रमात बोलताना दिला.
या पुढील काळात महायुतीचे शासन येईल या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये आणखी आम्ही वाढ करू मात्र ही योजना पाच वर्षे निर्विवादपणे चालेल असाही विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. या योजनेतून महिला भगिनींनी व्यवसाय सुरू केले गोरगरिबांना आम्ही मदत केली कॉंग्रेस वाले म्हणतायत आम्ही बंद करू अरे काय तुमच्या बापाच्या घरचे आहे का मला बाप काढायचा नव्हता पण त्यांना विचारायचे आहे तुमच्या वडिलांच घरच आहे का  असाही संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. इतका पैसा चांदया पासून बांद्यापर्यंत महिलांच्या हातात गेला त्या घरी ठेवत नाहीत त्या बाजारात जातात ग्रामीण भागातील दुकानात येतात 46 हजार कोटी रुपये मार्केटमध्ये फिरणार ना असं सांगत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या उपक्रमाबद्दल अजितदादांनी या योजनेचे कौतुक केले.
कोयनेच अवजल मुंबईला नेणार
कोयनेच्या अवजलावर काम सुरू असून यासाठी डीपी  तयार करण्याचं काम सुरू आहे. हे पाणी मुंबईलाही नेले जाईल इतकंच नाही तर तिसरी मुंबई चे काम सुरू आहे या ठिकाणीही या पाण्याचा उपयोग करण्यात येईल असे सुतोवाच उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांजवळ संवाद साधताना दिली आहे.
महायुतीचे जागावाट लवकरच अंतिम निर्णयापर्यंत
महायुतीच्या जागा वाटप संदर्भात आमची चर्चा झाली असून आम्ही लवकरच अंतिम निर्णयापर्यंत येऊ या संदर्भात जे काही आकडे माध्यमांकडे येत आहेत ते आम्हाला वाचल्यानंतर कळतात अशीही टिप्पणी त्यांनी यावेळी केली. आम्ही महायुतीचे तीनही पक्ष व घटक पक्ष यांना घेऊन हे जागा वाटप केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तिसऱ्या आघाडी बाबत बोलताना ते म्हणाले की त्यांच्याही विचाराचे मतदार आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने आपली ताकद आजमावत असतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

आणखी वाचा