रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत कोकणातही सध्या पवारांच्या सभेने वातावरण तापवल आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची शनिवारी
चिपळूण येथे सभा झाल्यानंतर पाठोपाठ आज सोमवारी झालेल्या थोरल्या पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात पवारांच्या सभेने वारे फिरले आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना घेरण्यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने कोकणातले वारं फिरलं आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली.
मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत संकेत थोरल्या पवारांनी दिले आहेत. त्यामुळे या सभेनंतर सत्ताधारी पक्षात असलेल्या आमदार शेखर निकम यांच्या
टेन्शन वाढवला आहे. सोमवारी झालेल्या सभेला माजीमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार रमेश कदम, उद्योजिका स्वप्ना यादव आदी उपस्थित होते.
प्रशांत यादव हे कोकणातील वाशिष्ठी डेअरीचे उद्योजक आहेत. त्यांनी याआधी चिपळूण तालुक्याची काँग्रेसची धुरा सांभाळली होती. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर येथील आमदार शेखर निकम हे अजित दादांच्या गटात सामील झाले. मात्र पवारांनी डाव टाकत उद्योजक प्रशांत यादव यांना आपल्या राष्ट्रवादीत प्रवेश देत उमेदवारीचा शब्द दिला. इतकच नाही तर त्यांना तयारीला लागण्यासाठी देखील सूचना केली होती. या पक्षप्रवेशानंतर प्रशांत यादव यांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम बैठका भेटीगाठी याचा धूमधडाका लावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव गेले होते.त्यानंतर सोमवारी आज शरद पवार यांच्या दौऱ्यावर भास्कर जाधव यांनीही शरद पवारांची भेट घेऊन त्यांचही स्वागत केल आहे. मात्र यानंतर झालेल्या पवारांच्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव भेटीबद्दल पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, आपल्याला भास्कर जाधव अनेकदा भेटत असतात असे सांगत आपण या भेटीला फार महत्त्व देत नाही असेच थेट सूचक विधान पवारांनी पत्रकार परि
षदेत केल आहे.










