चिपळूण, दि. २३ (प्रतिनिधी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की काँग्रेसची भ्रष्टा करायची टोळी आहे पण मी त्यांना सांगणार आहेया देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठा त्याग केला आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी या देशासाठी योगदान दिलं हा या देशाचा इतिहासाचा भाग आहे हे मी मोदींना पार्लमेंट मध्ये गेल्यावर ते सांगणार आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे वक्तव्य कसे करू शकतात याबद्दल मलाही आश्चर्य वाटतं अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
कोकणात चिपळूण येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावरती माजी मंत्री बाळासाहेब चिपळूण येथील माजी आमदार रमेशभाई कदम, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव,उद्योजिका स्वप्ना यादव आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, चंद्रबाबू नायडू आणि नितीनकुमार या दोन मुख्यमंत्र्यांची जर का मदत झाली नसती तर दिल्लीत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर बसले नसतं पण अजूनही यातून काही शिकले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली जात नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले की त्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे तुमच्या मूलभूत प्रश्नांची सोडवण्याची जबाबदारी आहे त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही आज या देशाला परिवर्तनाची गरज आहे असेही मोठे विधान पवार यांनी केल आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळीकडे जात होते ‘आबकी बार चारशे पार’ असे सांगणार्या मोदींना या देशातील जनतेने 240 जागा दिल्या अशा शब्दात पवार यांनी सुनावले आहे.
चिपळूण कराड रस्त्याची दुरावस्था – रस्त्यांच्या कामातही भ्रष्टाचार
कोकणातील रस्त्यांची दुरावस्था असून चिपळूण कराड या मार्गाची ही दुरावस्था झाली आहे या संदर्भात आपण मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्याला सांगणार आहोत या सगळ्या कामांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे रस्त्याच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पवार यांनी केला आहे
मुंबई गोवा महामार्ग चिपळूण कराड महामार्ग या सगळ्या रस्त्यांच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करावी असं आपलं मत आहे चिपळूण पाटण कराड हा महामार्ग तब्बल तीन वेळा दुरुस्त करण्यात आला तरी आज या रस्त्याची दुरावस्था आहे. मला ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मी गाडी घेऊनच प्रवास करतो त्यावेळेस कराड चिपळूण या रस्त्याची दुरावस्था मीही अनुभवली आहे लोकांजवळ बोललो आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी कोकणातील चिपळूण येथील दौऱ्यात केला आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी पवार यांनी सोमवारी जाहिर सभा घेत निवडणुकीआधी कोकणात राजकीय वातावरण तापवले आहे.