शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे प्रथम
या वेळी बंड्या साळवी म्हणाले की, राजकारण २० टक्के व समाजकारण ८० टक्के करायचे हा संदेश बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. शिवसेनेतर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धा प्रथमच आयोजित केली. स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. सध्या महाराष्ट्रात महाभयंकर स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीची स्पर्धा येणार आहे, ती आपल्याला जिंकायची आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक जिंकून त्याची सुरवात केली आहे. काल मातोश्रीवर जल्लोष होता. पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. कार्यकर्ते जबाबदारी आहे. संघटना कशी मोठी होईल. मताधिक्य कसे देता येईल, अशी सूचना त्यांनी केली.
राजेंद्र महाडिक व उदय बने यांनीही आपल्या मनोगतामध्ये विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, याचे सुतोवाच केले. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना दिल्या. स्पर्धेचे नियोजन चांगले केल्याबद्दल शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
उपशहरप्रमुख नितीन तळेकर, बावा चव्हाण, विभागप्रमुख सलील डाफळे, राजन शेटे, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, संदेश भिसे, नंदकुमार बने, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, उपशहरपमुख महिला उन्नती कोळेकर, विभागप्रमुख (महिला) पूजा जाधव, सेजल बोराटे, उपशहरप्रमुख विजया घुडे, स्मिता काटकर, सुवर्णा कडू, अमृता पाटील, राजश्री लोटणकर, सुहासिनी पूनसकर, बंड्या सुर्वे, सिद्धराज सावंत, जकी खान, संजय गायकवाड, पिंटया भागवत, संजय पावसकर, राजू नेरकर, शशी आलीम, बिपीन शिवलकर, प्रविण शिवलकर, राजू सुर्वे, पप्पू माजलकर, श्वेता फाळके, दिपाली जाधव, गीता शिंदे, हिना दळवी, दीपक सुवरे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.