रत्नागिरी, दि. ०१ (प्रतिनिधी): भारत शिक्षण मंडळ संचलित कै.सौ . विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दि. १आॅक्टोबर कै. नाना गांधी स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.डॉ. श्रीरंग कद्रेकर (कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मा.सौ.जानकी घाटविलकर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा जोशी, वाणिज्य शाखेच्या प्रमुख सौ. प्राजक्ता कुलकर्णी, सौ.वृंदाली गुरव, सौ मानसी चव्हाण, सौ.दिपिका आठल्ये, श्री. तानाजी वाघमारे. श्रीम.कल्पना नागवेकर शिक्षकवृंद उपस्थित होते. १ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कै.नाना गांधी स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.
नानांच्या १४व्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी नानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजच्या पर्यवेक्षिका सौ. वर्षा जोशी यांनी केले. विद्यार्थी मनोगतामधून कुमारी हिना परमार व तन्वी पटवर्धन यांनी प्रायोजक मा.श्री. शशांक गांधी यांनी निबंध स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद मानले. निबंध स्पर्धेच्या आयोजनामुळे आम्हां विद्यार्थ्यांना यातून प्रचंड प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले . आम्हांला विविध विषयांचे अवांतर वाचन करता आले असेही त्या म्हणाल्या. मा. अतिथी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कला विभागातून प्रथम- कु. झगडे सावरी संजय (बारावी कला)
द्वितीय – कु. शिंदे स्नेहल राजेंद्र (बारावी कला)
तृतीय- कु. धनावडे श्रावणी प्रवीण (बारावी कला)
उत्तेजनार्थ प्रथम- कु.बोंबले शर्वरी संजय (बारावी कला)
द्वितीय उत्तेजनार्थ -कु.कोकरे जिया चंद्रकांत( बारावी कला)
वाणिज्य विभागातून प्रथम कुमारी- पाटील शिवानी रमेश (बारावी वाणिज्य-ब)
द्वितीय- कु. परमार हिना इंद्रमल (बारावी वाणिज्य-अ)
तृतीय- शिंदे श्रावणी राजेंद्र (बारावी वाणिज्य -ब)
उत्तेजनार्थ प्रथम- कु. पटवर्धन तन्वी विनायक (बारावी वाणिज्य ब)
उत्तेजनार्थ द्वितीय- कु. शिंदे हरिप्रिया प्रशांत (बारावी वाणिज्य-अ),
विज्ञान विभागातून प्रथम- आग्रे शर्वरी संजय (बारावी विज्ञान),
द्वितीय – आंब्रे दीक्षा सचिन (अकरावी विज्ञान )
तृतीय- मातीवडर स्नेहा महादेव (अकरावी विज्ञान),
उत्तेजनार्थ प्रथम – नेवरेकर प्रियंका अमित (अकरावी विज्ञान)
उत्तेजनार्थ द्वितीय – चव्हाण पूनम विजय (अकरावी विज्ञान)
या विद्यार्थिनींनी निबंध स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावले. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. डाॅ. श्रीरंग कद्रेकर आपल्या मनोगतातून म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी मातृभाषेचे जतन केले पाहिजे, मोठे व्हा! बहुभाषिक व्हा! पण आपली संस्कृती टिकवा , आपल्या भाषेचे संवर्धन करा.” अध्यक्षीय भाषणातून सौ . जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये, विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच उत्सुकता दाखवली पाहिजे असे मत मांडले. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी माननीय श्री . शशांक गांधी यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसाठी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून खूप खूप आभार मानले. कै. नाना हे शिक्षणप्रेमी व कलाप्रेमी होते. कै. नानांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. नाना हे गांधी घराण्यातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. कै. नानांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देताना मा.सौ. जानकी घाटविलकर यांनी नानांच्या कर्तबगारीतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आदर्श निर्माण करावेत असेही सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी प्रचंड उत्साह दर्शवला.
निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ. प्राजक्ता कुलकर्णी, सौ. वृंदाली गुरव व सौ. मानसी चव्हाण यांचा यथोचित गौरव कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. तानाजी वाघमारे, सौ. दीपिका कुलकर्णी, श्रीमती कल्पना नागवेकर, श्री. पाडळकर आदी. सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार सौ . दीपिका कुळकर्णी यांनी मानले. कै. नानांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत अल्पोपहाराच्या वाटपासह नियोजनबद्धरितीने कार्यक्रम संपन्न झाला.