आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, लोकसभा व राज्यभेत जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार : राहुल गांधी

कोल्हापूर, दि. ०५ (प्रतिनिधी):  दलितमागासवंचित वर्गातील लोकांना उद्योगव्यवसायन्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची 50 % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहेइंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि लोकसभा व राज्यसभेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करू अशी घोषणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी केली.
कोल्हापुरातील संविधान सन्मान संमेलनात खासदार राहुल गांधी बोलत होतेते पुढे म्हणाले कीआज कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठोसपणे सांगता येत नाही त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. जातनिहाय जनगणना म्हणजे एक्सरे आहेएक्सरे काढल्यानंतर समस्या काय आहे ते समजेल व नंतर त्यावर उपाय करता येईल पण जातनिहाय जनगणेला भाजपाआरएसएसचा विरोध आहे. देशातील 90 टक्के जनतेला खरी माहिती कळू नये यासाठी ते विरोध करत आहेत. परंतु देशातील या ९० टक्के लोकांच्या हितासाठी जातनिहाय जनगणना लोकसभा व राज्यसभेत मंजूर करुन घेऊ आणि कोणतीही शक्ती याला रोखू शकत नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतोअसे राहुल गांधी यांनी सांगितले.
ज्यांच्या हातात कलाकौशल्यअनुभव आहे त्यांना मागे ठेवले जाते ही परिस्थिती आहे आणि यांच्याबद्दल शालेय अभ्यासक्रमात काहीच नाही. दलितमागास वर्गाचा इतिहास शिकवला जात नाहीत्यांचा इतिहास पुढे आला पाहिजे. शिक्षण क्षेत्रावर काही विशिष्ट लोकांचा पगडा आहे. गरिब घरातील मुलाला डॉक्टरवकीलइंजिनिअर व्हायचे आहे पण त्यातील काहीजणांचे हे स्वप्न पूर्ण होते आणि बाकीच्यांचे स्वप्न मोडीत निघते. अशा परिस्थीतीत भारत सुपर पॉवर कसा बनेलअसा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
 यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले कीआरक्षणाशिवाय मागास समाजाची प्रगती होणार नाही म्हणूनच राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ साली सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी आरक्षण लागू केले. राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घनिष्ट संबंध होते. शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क देऊन देशभर लागू केले. आज हे संविधान मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. खासदार राहुल गांधी हे संविधान रक्षक आहेत तसेच आपणही देशाचे संविधान अबाधित रहावे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शाहू महाराज यांनी केले.
 या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथलाप्रदेशाध्यक्ष नाना पटोलेविधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरातविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेपृथ्वीराज चव्हाणगोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेखासदार शाहू महाराजविधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटीलखासदार चंद्रकांत हंडोरेप्रणिती शिंदेरजनी पाटील, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खानअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीपकुणाल चौधरीकाझी निजामुद्दीनबी.वी. व्यंकटेशआ. भाई जगतापयुवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, NSUI चे आमीर शेखप्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडेप्रतिभा शिंदेसिव्हिल सोसायटीचे अशोक भारतीशाबीर अन्सारीडॉ. अनिल जयहिंदसुभाष यादवविजयेंद्र पाल गौतमपी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
त्यापूर्वी खासदार राहुल गांधी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट दिली व त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

आणखी वाचा