रत्नागिरी, दि. ७ : आज येथे वक्फ बोर्ड कार्यालयाचे उद्घाटन मा. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा कार्यक्रम पुर्णपणे सरकारी नियोजनाखाली ठरलेला होता. तरीही तो घाईघाईने पार पाडण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. कारण होते, या कार्यालयाच्या उदघाटनाला हिंदूत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता.
आज हिंदू समाजाचे नेतृत्व चंद्रकांत राऊळ करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यलयातून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाला निरोप देण्यात आला की ५०० स्क्वेअर फुटांची जागा द्या. या गोष्टीला आमचा विरोध आहे आमची गरीब शेतकऱ्याची जमीन तुम्हीं वक्त बोर्डाला देत आहेत. ती जमीन परत मिळवण्यासाठी खूप जाचक अटी आहेत. हे बोर्ड न्यायालयाचे ही ऐकत नाही. त्यामुळे भारत सरकार यावर विचार करत असताना या कार्यालयाचे
उदघाटन करण्याची घाई का ? असा सवाल यावेळी राऊळ यांनी केला. या कार्यक्रमाला जात असताना आणि घाईघाईने कार्यक्रम जेमतेम उरकून बाहेर पडत असताना उदय सामंत यांना हिंदू तरूणांनी काळे झेंडे दाखवून आमचा या कार्यालयालाच विरोध असल्याचे दाखवून दिले. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली.
मात्र पोलिसांना या घटनेची कल्पता असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले. यावेळी काही कार्यकर्त्यांची धरपकड़ही करण्यात आली.