रत्नागिरी, दि. १० (प्रतिनिधी): रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळासाहेब माने यांच्यातच होणार लढत….. अखेर आज बाळ माने यांनी सांगितलीच मन कि बात… रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महा लढत होण्याची शक्यता… रत्नागिरी येथील भारतीय जनता पक्षाचे दमदार व वजनदार नेते आणि माजी आमदार सुरेंद्र ऊर्फ बाळासाहेब माने यांचे अखेर ठरलेच…
बाळासाहेब माने यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले… व यापुढे मी वेगळीच भुमिका घेतोय याची सर्वांना कल्पना दिली.आणि काही काळ वातावरणात सन्नाटा पसरला. बाळ माने यांनी उपस्थितीना वेगळाच धक्का दिलाय. मागील काही दिवसां पासून बाळ माने हे महा विकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू होती. कारण बाळ माने यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची ब्रेकिंग न्यूज आली होती. परंतु बाळा साहेबांनी मात्र शेवटपर्यंत ताकास सुर लागू दिले नाहीच.भेटीचा फोटो ही दिला नाही.सर्व काही गुप्त पद्धतीने सुरू होते. विशेष म्हणजे बाळ माने यांना भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा आतुन आशिर्वाद व पाठिंबा आहे असे बोलले जात आहे.
लोक सभेच्या निवडणुक निकाला पासून रत्नागिरी येथील भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गटात ) उघडपणे धुसफूस सुरू आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे जे जे शासकीय कार्यक्रम घेतले त्याला भाजप चा एक ही लहान किंवा मोठा नेता उपस्थित राहीलेला नाही.हे जगजाहीर आहे.(काही अपवाद वगळता) त्यामुळे रत्नागिरी येथे महायुती मध्ये सर्व काही आलबेल आहे असे आज तरी दिसत नाही… किंवा तसे म्हणणे धाडसाचे ठरेल…विधानसभा निवडणुकीची पुढील काही दिवसांतच घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे… आज तरी बाळ माने हे पुढील काही तासांतच मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका जाहीर करणार आहेत. आणि लगेचच भाजप ला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार हे आता जवळपास नक्की झाले असल्याची चर्चा आज दिवसभर रत्नागिरी येथे नाक्या नाक्यावर ऐकू येत होती. कारण बाळासाहेब माने यांनी आज अगदी स्पष्ट आणि क्लिअर संकेत दिले आहेत.. रत्नागिरी येथील उबाठा च्या काही नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना छेडले असता ते म्हणाले आम्ही मातोश्रीवरून येणार्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असे सांगून एक प्रकारे त्यांनी बाळ माने यांच्या शिवसेना प्रवेशाला दुजोराच दिला आहे.
काही जणांनी विरोध केला असला तरी तो क्षणीक असेल असे बोलले जात आहे… कारण शिवसेना पक्ष आदेशावर चालतो आणी आदेश आला कि सर्व जण मनापासून बाळ माने यांचे काम करणार असे म्हणाले, मागील काही दिवसां पासून च्या घडामोडी पहाता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने आणि उदय सामंत यांच्यात सामना होणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. काही दिवसांपूर्वी बाळ माने यांनी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली व दादा मी उभा राहतोय. लक्ष असू दे असे म्हटले असल्याचे समजते. तसे पाहिले तर बाळासाहेब माने यांनी मुंबई येथे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत व आपण पुढे काय करणार याची कल्पना ही दिली आहे अशी माहिती आता समोर आली आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कोण असेल उमेदवार व काय असेल चित्र हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.परंतु कुछ तो गडबड है…कारण बाळ माने हमारे साथ असे आता उघडपणे महाविकास आघाडीचे नेते बोलु लागले आहेत.