दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य वितरण शिबीरांचे आयोजन

रत्नागिरी, दि. १४ जून: भारत सरकारच्या सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत एडीप (ADIP) व राष्ट्रवयोश्री (RVY) योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यभूत साहित्य वाटप शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार श्री. नारायण राणे व खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले आहे.
याअंतर्गत, २४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ या कालावधीत जिल्हाभरात तपासणी शिबिरे घेण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे विविध तालुक्यांमध्ये साहित्याचे वितरण होणार आहे. लाभार्थ्यांनी तपासणीवेळी मिळालेली पावती व आधारकार्ड घेऊन उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
या शिबिरांचे उद्घाटन १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
तालुका निहाय वितरणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
1. रत्नागिरी 16/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव
2 लांजा 17/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 न्यू इंग्लिश स्कूल, लांजा
3 राजापूर 18/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 आबासाहेब मराठे कॉलेज, हातीवले, राजापूर
4 संगमेश्वर 19/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 पंचायत समिती सभागृह, देवरुख
5 चिपळूण 20/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 ग्रामीण रुग्णालय, कामथे
6 गुहागर 21/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 पंचायत समिती, गुहागर
7 दापोली 23/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 पंचायत समिती सभागृह, दापोली
8 मंडणगड 24/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मंडणगड
9 खेड 25/06/2025 सकाळी 10 ते दुपारी 4 सभापती निवासस्थान, पंचायत समिती, खेड
जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपले साहित्य स्विकारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा