खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन कोमल जांगळी यांनी पक्षात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रभागातील दर्शन जांगळी, विक्रांत सांगळे, ओंकार सांगळे, कल्पेश जांगळी, मनोहर जांगळी यांच्यासह कीर्तनवाडी येथील स्वप्निल मुकनाक, संदीप फटकरे आणि महेंद्र जोशी या युवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी गुहागर शहरातील विविध विकासकामे आणि आगामी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पक्षात नव्याने दाखल झालेल्या सर्वांचे खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केले.
या पक्षप्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अजयशेठ बिरवटकर, महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, रमा बेलोसे, जयंत जळगावकर, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, नगरसेवक सौरभ भागडे, युवक अध्यक्ष संदेश भागडे, सेक्रेटरी संतोष जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, कार्याध्यक्ष माधव साटले, आर्यन वराडकर, दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोमल जांगळी यांच्या पक्षप्रवेशामुळे गुहागर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.







