बालवयात दातांचे आरोग्य जपणे, दंतविकारांना प्रतिबंध करणे, आजारांचे वेळीच निदान करणे आणि लहान मुलांमध्ये दंतआरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, या दृष्टीने ही शाखा महत्त्वपूर्ण मानली जाते. या विशेष क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण करून डॉ. श्रिया यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. श्रिया या संगमेश्वरमधील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रदीप खातू यांच्या कन्या आणि चिपळूणमधील तज्ज्ञ डॉ. प्रसाद खातू यांच्या भगिनी आहेत. तसेच त्या उद्योजक वैभव नथुराम रेडीज यांच्या स्नुषा आहेत.
या यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी डॉ. श्रिया यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या ज्ञानाचा लाभ परिसरातील बालकांच्या दंतआरोग्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, समीर जानवलकर, संदीपशेठ जागुष्टे, विजय भुवड, वरुण गुडेकर, सचिन साडविलकर, विश्वनाथ कांबळे, राजा कदम यांच्यासह रेडीज परिवारातील सदस्य उपस्थित होते. डॉ. श्रिया यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







