सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, सन २०२५-२६ च्या जमाखर्चास मंजुरी, गतवर्षातील कामकाजाचा आढावा आणि आगामी ध्येयधोरणांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या प्रारंभी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी, संचालक कुपेश दळवी आणि मुख्याध्यापिका सुप्रिया पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष मंगेश सावंत यांचा रामचंद्र केळकर व निवडणूक निरीक्षक गजानन पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघटनेत २८ वर्षे विविध पदांवर योगदान देणारे आणि गतवर्षी शिक्षकपदी पदोन्नती मिळालेले मनीष दळवी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी महेश कदम, उपाध्यक्षपदी लक्ष्मण लोखंडे, मनोज लाबणे व मिलिंद काटवे, कोषाध्यक्षपदी अमोल पलसुलेदेसाई, अन्याय निरीक्षकपदी नामदेव चव्हाण आणि महामंडळ प्रतिनिधीपदी शंकर पाळतणकर यांची निवड झाली. तसेच रामचंद्र केळकर, गजानन पाटणकर, प्रकाश सावळी, मनोहर दयाळकर, राजेश पवार, सुधाकर भोजने, संदीप पाटे, आतिरा मुल्ला व अनुजा पवार यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.
गजानन पाटणकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. अमोल लिगायत यांच्या कार्यवाहीसह निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभेचे सूत्रसंचालन मनीष दळवी यांनी केले. यावेळी बहुसंख्य सभासद कर्मचारी उपस्थित होते.







