दापोली, दि. ०७ (प्रतिनिधी): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी) पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोलीची कल्याणी पाटील ही कै. डॉ.अशोक पोवार स्मृती पुरस्काराची प्रथम मानकरी ठरली आहे. अलीकडेच झालेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान समारंभामध्ये तिला या पुरस्काराने गौरविण्यात आले.