आकले, दि. २७ (प्रतिनिधी): कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करत समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुप यांच्या वतीने मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकले येथील शिक्षकांना “कोविड योद्धा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमात संस्थेचे समाजसेवक श्री. विनेश भाऊ मोहिते यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. संजू वाघमारे, सहाय्यक शिक्षिका सौ. मनस्वी अमित जोशी, सहाय्यक शिक्षक श्री. निलेश नागे, श्री. विजय वणवे तसेच महाविद्यालयातील इतर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.
या शिक्षकांनी कोविड काळात लॉकडाऊनच्या प्रतिकूल परिस्थितीतही मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून वाडी-वस्तीत जाऊन घरोघरी शैक्षणिक सेवा दिली. समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या या शिक्षकांचा कर्तव्यपरायणतेचा आणि माणुसकीच्या भावनेचा आदर्श समाजासमोर ठेवणारा ठरला. त्यांच्या या सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक सेवक व माजी सैनिक संभाजी चव्हाण, प्रसाद वनगे, सुधीर मोरे, नितीन शिगवण, वैभव मोहिते, राहुल कदम, राहुल मोरे, राजेश यादव, माजी सैनिक दीपक यादव, आकलेच्या सरपंच सौ. सुमित्रा कांगणे, ग्रामसेवक संजय बगगर, नितेश निकम, दत्ताराम मनवल, राजेंद्र देवरे, केशव खाडे सर, सचिन पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानामुळे शिक्षकांच्या कार्याचा योग्य गौरव झाला असून समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. “कर्तव्यतत्पर पावलांनीच उमलते नवी दिशा” हे या कार्यक्रमाचे अधोरेखित होत आहे.








