मुंबई, दि. ०७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ऐतिहासिक परंपरा, वैभवशाली किल्ले आणि छायाचित्रकारांच्या कलासक्त नजरेचा संगम साधणारी एक खास स्पर्धा राज्यभरातील कला-प्रेमींना साद घालत आहे. श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेच्या वतीने फोटोग्राफी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून, ही स्पर्धा महाराष्ट्रातील गडकोटांचे अनोखे सौंदर्य जगासमोर मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
स्पर्धेसाठी दोन विशेष विषय निश्चित करण्यात आले आहेत –
-
“युनेस्को हेरिटेज १२ किल्ले”
-
“महाराष्ट्रातील इतर किल्ले”
या विषयांच्या माध्यमातून छायाचित्रकारांना ऐतिहासिक वारशाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि त्याचे दर्शन इतरांना घडवण्याची संधी मिळणार आहे. प्रवेश अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले असून, ३१ ऑगस्ट २०२५ ही नोंदणीसाठी अंतिम तारीख आहे.
✦ पारितोषिकांची रचना अशी –
प्रत्येक थीमसाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार असून –
-
पहिला क्रमांक – ₹५,०००/-
-
दुसरा क्रमांक – ₹३,०००/-
-
तिसरा क्रमांक – ₹२,०००/-
-
प्रोत्साहनपर पारितोषिक – ₹१,०००/-








