कोकण रेल्वे स्थानक चिपळूण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कोविड योद्धा’ पुरस्काराने गौरव

चिपळूण,दि. १७ : कोरोनाच्या भीषण महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलेल्या कोकण रेल्वे स्थानक, चिपळूण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सामाजिक विकास ग्रुपतर्फे ‘कोविड योद्धा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोना काळात चिपळूण हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असे. येथे लांबपल्ल्याच्या गाड्यांचा थांबा, तिकीट काउंटरवरील गर्दी, गाड्यांना पाणी भरण्याची सोय अशा परिस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट प्रवाशांच्या संपर्कात राहून काम करावे लागत होते. अशा संकटाच्या काळातही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून समाजासमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये रेल्वे पर्यवेक्षक वीरेंद्र कुमार, वैद्यकीय अधिकारी शिरीष मदर, आरपीएफ निरीक्षक व्ही. के. हाडके, वरिष्ठ अनुभाग अभियंता सुरेश माळगुणकर, स्टेशन मास्टर मशना डोणगावे, तसेच श्रीकांत खोंड, सौ. सुचिता धामणस्कर, रणजीत पन्हाळकर यांच्यासह इतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सामाजिक सेवक व माजी सैनिक संभाजी चव्हाण, सचिन पवार सर, विवेक जाधव, शितल नरळकर, कमल कदम, पूजा सागवेकर, दीपाली मोहिते, दैवत मोहिते, आर्या मोहिते, जयश्री जाधव, प्रियांक कदम, आंकिता सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड काळातील प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा योग्य गौरव झाला असून, समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. “कर्तव्यतत्पर पावलांनीच उमलते नवी दिशा” या ओळी या सन्मान सोहळ्यात अधोरेखित झाल्या.

आणखी वाचा