सिंधुदुर्ग, दि. २९ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील हे ३१ ऑगस्ट रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी राज्य शासनाने तृप्ती धोंडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
नव नियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोंडमिसे या यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होत्या. आता त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनाची धुरा सांभाळणार आहेत.